30 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरक्राईमनामाप्रतापगडच्या पायथ्याशी पुन्हा झाले अतिक्रमण

प्रतापगडच्या पायथ्याशी पुन्हा झाले अतिक्रमण

हिंदू एकता संघटनेने बांधकाम जमीनदोस्त करण्याची केली मागणी

Google News Follow

Related

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडा यांच्या थडग्याभोवती वनखात्याच्या जमिनीवर जे मोठ्या प्रमाणात इस्लामिक अतिक्रमण झाले होते. त्या अतिक्रमणविरोधात शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाने २१वर्षे लढा दिला.अफजल खान,सय्यद बंडा यांच्या थडग्याचे रूपांतर दर्ग्यामध्ये करण्यात आले होते.अनेक वर्ष त्या दर्ग्यामध्ये अफजलखानाच्या नावाने उरूस भरत होता. त्या उरसामध्ये कोंबडी व बकऱ्याचा बळी दिला जायचा. तसेच नवस बोलले जायचे. हे सर्व शिवप्रताप भूमी मुख्य आंदोलनाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करून बंद पाडले. आता गडाच्या पायथ्याशी नवे अतिक्रमण झाले आहे.

१० नोव्हेंबर २०२२ रोजी अफजलखानाच्या नावाने निर्माण झालेल्या बेकायदेशीर दर्ग्यावर १९ खोल्या,नमाज पडण्यासाठी बांधलेला बेकायदेशीर हॉल महायुती सरकारने बुलडोजर लोन जमीनदोस्त केला आणि बांधकामाचे सर्व साहित्य दरीत ढकलून दिले. याला दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आधी तिथूनच जवळ असलेल्या पाचशे फुट अंतरावर नव्याने दरीत फेकून दिलेल्या पत्र्याचा, लोखंडी अँगल यांचा वापर करून मोठे बांधकाम करण्यात आले आहे.

हे हिंदू एकता आंदोलनाच्या शिष्ट मंडळाने पाहणी केल्यास निदर्शनास आले. भविष्यात प्रताप भूमी मुक्ती आंदोलनाने बंद पाडलेला उरूस त्या नव्याने बांधलेल्या जागेत भरू शकतो आणि पुन्हा अफजलखानाचे उदात्तिकरण होऊ शकते तसेच कायदा व सुववस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

हे ही वाचा:

दादरचे ‘कुर्ला’ नको म्हणून…

एलन मस्कची संपत्ती ४०० अब्ज डॉलर्स पार!

पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असलेल्या दोघांना भिवंडी, अमरावतीमधून घेतले ताब्यात

जौनपूरच्या अटाला मशिदीच्या सर्वेक्षणाच्या निर्णयावर होणार सुनावणी

तरी प्रशासनाने ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन सदर जागेचा सातबारा उतारा व ८अ उतारा कोणाच्या नावाने आहे.सदर बांधकाम करताना वन विभागाची परवानगी घेतली आहे का? तसेच सदरचे बांधकाम जमीनदोस्त करावे, अशी मागणी प्रतापगडावर शिवप्रताप दिनाच्या दिवशी उपस्थित असलेले वाई विभागाचे प्रांत व तहसीलदार यांच्याकडे हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली.

यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष व शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक-माजी आमदार नितीन शिंदे,माजी नगरसेविका स्वाती शिंदे,हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, हिंदू एकताचे शहर उपाध्यक्ष राजू जाधव, सांगलीवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार,खाणभाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव,प्रदीप निकम, श्रीधर मिस्त्री,गजानन मोरे, अतुल नाझरे,अनुज निकम, निखिल सावंत,चेतन भोसले,पंकज कुबडे,मयूर निकम,आनंद उत्तेकर,उमेश पाटील इ.उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा