अनधिकृत मार्गाने दत्तक आणि विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट
करोनाच्या संकटात कोण कसा फायदा उठवेल हे सांगता येत नाही. करोनाच्या संसर्गामुळे अनेकांचे जीव गेले आणि त्यांची मुले अनाथ बनली. अशा अनाथ मुलांवर समाजकंटकांची नजर वळली आहे.
दत्तक घेण्याच्या बहाण्याने त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे. राज्यातील महिला आणि बाल कल्याण विभागाने हे स्पष्ट केले की, आपल्या आईवडिलांना गमावलेल्या दोन मुलांना अनधिकृत मार्गाने दत्तक घेऊन नंतर त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले आहे. अशा गैरकृत्यांसाठी फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडियावर भावनिक आवाहन केले जाते. मुले दत्तक घेता येतील असे आवाहन या जाहिरातीतून केले जाते. पण अशा पद्धतीने मुलांना दत्तक घेणे आणि त्यांची विक्री करणे हा गुन्हा आहे. असे गैरकृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाते.
कोल्हापुरात १५ मे पर्यंत लॉकडाऊन
ठाणेकरांसाठी भाजपातर्फे प्लाझ्मा हेल्पलाईन
शरजीलचे अकाऊंट सुरू, कंगनावर कारवाई
अशा घटना रोखण्यासाठी महिला व बालकल्याण आयुक्तालयाने १०९८ हा क्रमांक जारी केला असून त्यावर मदत मागता येईल. तसेच अशा गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी राज्य दत्तक ग्रहण प्राधिकरणाने ८३२९०४१५३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल सुरक्षा कक्ष, बाल कल्याण समिती, पोलिस यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही अशा कृत्यांची माहिती देता येईल. ज्यांना मुले दत्तक घ्यायची असतील त्यांनी www.cara.nic.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यासंदर्भात अर्ज करता येईल.