रिफ्लेक्टिव्ह कॉन्सकडे केलेले दुर्लक्ष पडले महाग

फ्लेक्टिव्ह कॉन्सकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली.

रिफ्लेक्टिव्ह कॉन्सकडे केलेले दुर्लक्ष पडले महाग

वरळी सी लिंकवर ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या अपघाताच्या बाबतीत नवी माहिती समोर आली आहे. ज्याच्या चुकीमुळे हा अपघात घडला त्याने रिफ्लेक्टिव्ह कॉन्सकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली.

इरफान बिलकिया (४०) हा ५ ऑक्टोबर रोजी सी लिंक वर घडलेल्या अपघातासच कारणीभूत ठरला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्या अपघातामध्ये पाच लोक मारले गेले आणि १३ जणं जखमी झाले. पोलीसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की त्याने घटना स्थळी लावलेल्या रिफ्लेक्टर कॉन्सकडे आणि इशारा देण्याऱ्या टोल कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष केले. दस्तऐवजात एका अहवालाचा हवाला दिला आहे की बिल्कियाचा वेग १०९ किमी होता.

एका प्रत्यक्षदर्शी टोल कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितले की “तो आणि त्याचा २४ वर्षांचा सहकारी त्या रात्री स्विफ्ट गाडीच्या अपघाताचे निरीक्षण करत होते. एक मर्सिडीज कार पीडितांना मदत करण्यासाठी थांबली होती. पीडितांना मदत करण्यासाठी २-३ गाड्या उभ्या होत्या. तेव्हा बिल्कियाची क्रेटा अचानक नजरेत आली. त्याने प्रथम माझा सहकारी राजेंद्र राजपूत याला उडवलं. त्याची गाडी वेगात असल्यामुळे मी पटकन बाजूला उडी मारली. त्याने सगळ्या उपस्थित गाडयांना धडक दिली. परिणामतः एक मोठा आणि भयानक अपघात घडला. मी स्तब्ध होऊन बसलो. त्यानंतर काय झाले ते मला आठवत नाही”.

हे ही वाचा:

१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’

महिला क्रिकेट सामन्यांत प्रेक्षकांनीच केला विक्रम

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय झाले

सी लिंकच्या एका भागात एएनपीआर (स्वयंचलित नंबर-प्लेट ओळख) कॅमेरा बसवण्यात आला असल्याचेही त्यात म्हटले आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की आठ पीडितांचे तक्रारी नोंदवले जाऊ शकत नाही कारण ते अद्याप वैद्यकीय उपचार घेत आहेत.

Exit mobile version