नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन आयईडी स्फोटाने उडवले

चालकासह आठ डीआरजी जवान हुतात्मा

नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन आयईडी स्फोटाने उडवले

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या गाडीवर मोठा हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन आयईडी स्फोटाने उडवले. या घटनेत चालक आणि आठ डीआरजी जवान हुतात्मा झाले आहेत. सोमवार, ६ जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य करत आयईडी स्फोट घडवून आणला. बस्तर रेंजच्या आयजींनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात सहाहून अधिक जवान जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दंतेवाडा डीआरजीचे आठ जवान शहीद झाले असून या हल्ल्यात चालकाचाही मृत्यू झाला आहे. दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर येथे संयुक्त कारवाई करून हे सर्वजण परतत होते. . नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. नक्षलवाद्यांनी कुत्रू रोडवर आयईडी पेरला होता, त्याचवेळी सुरक्षा दलाचे वाहन तिथून जात असताना या आयईडीचा स्फोट झाला.

हे ही वाचा : 

केजरीवालांच्या शीशमहालावर ८ नव्हे ३३ कोटींचा खर्च, २९ लाखांचा फक्त टीव्ही!

पन्नूला आली धमकी देण्याची पुन्हा खुमखुमी, महाकुंभला दिला इशारा

मध्य प्रदेशमध्ये लव्ह जिहाद !

एमके स्टॅलिन यांनी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला

छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील दक्षिण अबुझमाड येथील जंगलात शनिवारी (४ जानेवारी) संध्याकाळी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलवादविरोधी कारवाईसाठी निघाले असताना ही चकमक झाली.

Exit mobile version