चोरट्यांनी चोरल्या ४५० वर्षे जुन्या मूर्ती

समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत.

चोरट्यांनी चोरल्या ४५० वर्षे जुन्या मूर्ती

जालन्यात एका मंदिरातील मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली आहे. समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या मंदिरातून श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या पंचधातूच्या मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तीर्थक्षेत्र ‘जांब समर्थ’ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. जांब समर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात श्रीराम, सितामाता, लक्ष्मण, हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेष म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी आणि हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. साधारण ४५० वर्षे अशा या जुन्या मूर्ती होत्या.

चोरट्यांनी सोमवार, २२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मंदिरातून श्रीराम, सिता, लक्ष्मण, हनुमानांच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करत संताप व्यक्त केला होता.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे’गद्दार’ सोडा खुद्दार बना!

‘मेटेंची गाडी ओव्हरेटक करताना ड्रायव्हरचं जजमेंट चुकलं आणि अपघात झाला’

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

‘जांब समर्थ’ मंदिराला तीर्थक्षेत्र ब दर्जा देण्यात आला आहे. या मंदिराच्या सुरक्षेसाठी अद्याप सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले नाहीत. त्यात पहाटे वीज जात असल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Exit mobile version