भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, अंदमानमध्ये ५ टन ड्रग्ज जप्त!

सहा जणांना अटक, अधिक तपास सुरु

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, अंदमानमध्ये ५ टन ड्रग्ज जप्त!

भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई केली आहे. अंदमानच्या समुद्रात भारतीय तटरक्षक दलाने तब्बल ५ टन ड्रग्ज जप्त केले आहे. भारतीय तटरक्षक दलाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती समोर येत आहे.

संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय तटरक्षक दलाने अंदमानच्या समुद्रात एका मासेमारी बोटीतून सुमारे पाच टन ड्रग्जची मोठी खेप जप्त केली आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा : 

सेन्सेक्स १२०० अंकांनी वधारला

नौदलाच्या INSV तारिणीने ऑस्ट्रेलियातून दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेला सुरुवात

संविधानाला राजकारणापासून दूर ठेवायला हवे

निवडणुकीतील पराभावानंतर काँग्रेसकडून लोकशाही मुल्यांचा अनादर

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, २३ नोव्हेंबर रोजी नियमित गस्तीदरम्यान, तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाच्या पायलटने बॅरन आयलँडजवळ फिशिंग ट्रॉलरच्या संशयास्पद हालचाली पाहिल्या. हे पोर्ट ब्लेअरपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर आहे. ट्रॉलरला इशारा देऊन वेग कमी करण्यास सांगितले.
यानंतर पायलटने अंदमान निकोबार कमांडला अलर्ट केले. लगेच आमची जलद गस्तीची जहाजे बॅरेन बेटाच्या दिशेने निघाली. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी फिशिंग ट्रॉलरला पुढील तपासासाठी पोर्ट ब्लेअरला नेण्यात आले. या प्रकरणी मासेमारीच्या ट्रॉलरमधून म्यानमारच्या सहा नागरिकांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.
Exit mobile version