पुण्यातील एका आयएएस अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. पुण्यात हे अधिकारी महसुल विभागात कार्यरत होते. लाच स्वीकारत असताना सीबीआयने ही कारवाई केली आहे. अनिल रामोड असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव असून ते अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
आयएएस अधिकारी अनिल रामोड हे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. एका जमीनीच्या व्यवहारात ते आठ लाख रुपयांची लाच स्विकारताना सीबीआयने धाड टाकली. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
चित्रा वाघ संतापल्या, आव्हाड नाही…हाड हाड!
‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर आशिया कप, वर्ल्ड कप मोफत पाहता येणार
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत महिन्याभरात १६३ मुले पुन्हा कुटुंबीयांकडे परतली!
पाकिस्तान सीमेवर ३७ कोटींचे हेरॉईन जप्त
माहितीनुसार, एका महामार्गालगत असलेल्या जमीनीच्या व्यवहारासाठी अनिल रामोड हे आठ लाख रुपयांची लाच स्वीकारत होते. यावेळी सीबीआयने त्यांना रंगेहाथ पकडले. सीबीआयने सापळा रचून ही कारवाई केली. सीबीआयने केलेली पुण्यातील ही मोठी कारवाई असून यानंतर पुढील तपास सुरू आहे. आयएएस अधिकाऱ्यावर सीबीआयने धाड टाकल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.