भारत- पाकिस्तान सीमेजवळ मिग विमानाचा अपघात; विंग कमांडरचा मृत्यू

भारत- पाकिस्तान सीमेजवळ मिग विमानाचा अपघात; विंग कमांडरचा मृत्यू

राजस्थानातील जैसलमेर येथे भारत- पाकिस्तान सीमेजवळ भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले असून या दुर्घटनेत पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवार २४ डिसेंबर रोजी रात्री हा अपघात घडला.  या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला तातडीने देण्यात आली त्यानंतर यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन मदत आणि बचावकार्य करण्यात आले.

जैसलमेरमधील सुदाशिरी गावाच्या हद्दीत हवाई दलाचे मिग- २१ (MiG21) विमान कोसळले. भारत- पाकिस्तान सीमेपासून जवळच ही दुर्घटना घडली असून या घटनेची हवाईदलाकडून चौकशी करण्यात येईल, असे भारतीय हवाईदलाकडून सांगण्यात आले आहे. सुदाशिरी येथे रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नियमित प्रशिक्षणाचा भाग म्हणून या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचे निधन झाले आहे.

हे ही वाचा:

‘फुकट’ची मारहाण आली अंगलट, पोलीस अधिकारी निलंबित

शुक्रवार मध्यरात्रीपासून राज्यभर नवे निर्बंध; जाणून घ्या!

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे!

पंजाबच्या राजकारणाला मिळणार नवी ‘फिरकी’?

या अपघातामागे नेमके काय कारण होते; खराब हवामान, तांत्रिक बिघाड, की आणखी काही याची हवाई दलाकडून चौकशी करण्यात येणार आहे. विमान अपघातादरम्यान विमान जमिनीवर कोसळल्याचा मोठा आवाज झाला. यानंतर, गावातील लोक सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. यानंतर माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी पोहोचले. संबंधित वैमानिकाला वाचविण्याचाही प्रयत्न करण्यात आला, पण ते गंभीररित्या भाजले होते आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version