‘मी क्रिकेट बुकी जरी असलो तरी माझा कुठल्याही गुंड टोळ्यांशी संबंध नाही, मात्र मला रवी पुजारीचा साथीदार दाखवून माझ्याकडून खंडणी उकळण्यात आली,’ असा खळबळजनक आरोप क्रिकेट बुकी सोनू जालान याने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यावर केला आहे. वरळी येथे झालेल्या पत्रकार परिषदमध्ये जलानने हे आरोप केले. २०१८ मध्ये परमबीर सिंह यांनी मकोका लावून माझ्याकडून ३ कोटी ४५ लाख रुपये वसूल केले. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत.
हे ही वाचा :
मुलुंडमध्ये रेकॉर्डब्रेक रक्तदान
ऑलिंपियन कुस्तीगीर सुशील कुमारचा शोध घेण्यासाठी ‘लूकआऊट’ नोटीस
संजय राऊतांची वैचारिक पातळी लक्षात आली… भूषणसिंह कडाडले
आमदार कांबळेंकडून आरोग्य अधिकाऱ्याला मिळाल्या शिव्या, धमक्या
सोमवारी सोनू जालान याने वकील आभा सिंह यांच्या वरळी येथील घरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना सोनू जलान याने पुन्हा तीच री ओढत माझा रवी पुजारीही संबंध जोडण्याचा प्रयत्न परमबीर सिंह यांनी केला असल्याचा आरोप केला आहे. जालानने सांगितले की, ‘आतापर्यत मी घाबरत होतो की, हे लोक माझे काहीही करू शकतात म्हणून शांत होतो, मात्र आता मी मनाची तयारी करून पुढे आलो आहे. माझ्या तक्रारीची दाखल घेतली गेली नाही तर मी परमबीर सिंह, प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करीन.’ सोनू जालान याने पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारअर्ज दाखल केला आहे. एसीबी ही गोपनीय चौकशी करीत आहे.
सोनू जालान हा क्रिकेट बुकी असून त्याच्यावर मुंबई, ठाणे, दिल्ली या ठिकाणी क्रिकेटवर सट्टा चालवत असल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल असून त्याला अनेक गुन्ह्यात अटक देखील झाली. मात्र तो जवळपास सर्व गुन्ह्यात जामिनाबाहेर असून त्याच्यावर विविध न्यायालयात खटले सुरु आहेत.