“कलमा म्हणू शकलो म्हणून वाचलो…” हिंदू प्राध्यापकाने सांगितली घटना

आसाममधील एका हिंदू प्राध्यापकाचा वाचला जीव

“कलमा म्हणू शकलो म्हणून वाचलो…” हिंदू प्राध्यापकाने सांगितली घटना

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक जखमी आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची ओळख विचारून केवळ हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. अनेक प्रत्यक्षदर्शीनी या घटनेचे वर्णन केले आहे. नावे विचारून, ओळखपत्र तपासून दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. काहींना कलमा (इस्लामिक श्लोक) म्हणण्यास सांगण्यात आले. कलमा म्हणता न आल्याने दहशतवाद्यांनी अनेकांना ठार केले. ज्यांनी कलमा पठण केले त्यांना दहशतवाद्यांनी सोडले, असेही काहींनी सांगितले.

आसाममधील एका हिंदू प्राध्यापकाचा जीव अशाच प्रकारे वाचल्याचे समोर आले आहे. त्यांना कलमा म्हणता येत असल्याने दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या नाहीत. यामुळे आसाम विद्यापीठातील बंगाली विभागातील सहयोगी प्राध्यापक देबाशीष भट्टाचार्य यांचे प्राण वाचू शकले. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा देबाशिष भट्टाचार्य हे त्यांच्या कुटुंबासह घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, “हल्ला होताच मी माझ्या कुटुंबासह एका झाडाखाली आश्रय घेतला. त्यावेळी आजूबाजूचे लोक कलमा म्हणत असल्याचे ऐकू आले. हे ऐकल्यानंतर मी ही कलमा वाचायला सुरुवात केली. काही वेळाने दहशतवादी माझ्याकडे आला आणि त्याने शेजारी झोपलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर दहशतवाद्याने माझ्याकडे पाहिले आणि विचारले की तू काय करत आहेस? कलमा पठण करत असल्याचे लक्षात येताचं तो वळला आणि तिथून निघून गेला,” अशी माहिती हिंदू प्राध्यापकांनी दिली.

यानंतर, प्राध्यापकांना संधी मिळताच, ते त्यांच्या पत्नी आणि मुलासह शांतपणे घटनास्थळाहून पळून सुरक्षित ठिकाणी आले. सुमारे दोन तास चालल्यानंतर ते तिथून बाहेर पडून हॉटेलमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाले. भट्टाचार्य म्हणाले की, त्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये की, ते जिवंत आहेत.

हे ही वाचा : 

पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून सैफुल्लाह कसुरीचे नाव समोर!

उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी हे पारंपरिक उपाय अवश्य आजमवा

संस्कृत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा योगी सरकारचा काय संकल्प

पहलगाम हल्ल्यात दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश!

दरम्यान, पुण्यातील एका व्यावसायिकाच्या मुलीनेही असाच दावा केला की, दहशतवाद्यांनी पुरुष पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांना लक्ष्य केले. मंगळवारी झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोन व्यावसायिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर २६ वर्षीय आसावरी यांनी सांगितले की, बेताब व्हॅलीमधील मिनी स्वित्झर्लंड येथे दहशतवाद्यांनी तिच्या वडिलांची आणि काकांची गोळ्या घालून हत्या केली. दहशतवाद्याने तिच्या वडिलांना एक इस्लामिक श्लोक (कलमा) वाचायला सांगितले आणि ते न आल्याने वडिलांवर गोळ्या झाडल्या.

पाक लष्करप्रमुख मुनीर जे बोलले तेच पहलगाममध्ये घडले ! | Mahesh Vichare | Pahalgam | Asim Munir |

Exit mobile version