आता मला कोणतीही माहिती देण्याची इच्छा नाही

आता मला कोणतीही माहिती देण्याची इच्छा नाही

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाणे न्यायालय आणि मुंबईतील किल्ला कोर्टानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात १०० कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून परमबीर सिंह गायब आहेत. मात्र, आता सिंह यांच्याकडून एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याची माहिती मिळतेय. “आता मला कोणतीही माहिती देण्याची इच्छा नाही.” त्यांनी असे लिहिलेले पत्र चांदीवाल आयोगाकडे सादर केल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमबीर सिंगचा शोध लागलेला नाही. मुंबई गुन्हे शाखेने काल सिंग यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी एस्प्लेनेड कोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा त्यांचा शोध घेत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंग यांचा पगार या वर्षीच्या मे महिन्यापासून रोखून धरला आहे. सिंग यांचा ठावठिकाणा नसल्याचे कारण देत सरकारने ही कारवाई केली आहे. सिंग यांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल पाच एफआयआर नोंदवण्यात आले असून त्यांच्यावरील मुख्य आरोप खंडणीचा आहे. सिंग यांच्यावर दोन कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

हे ही वाचा:

शिवप्रतिष्ठान संघटनेने का केला समीर वानखेडेंचा सन्मान?

घरोघरी जाऊन लसीकरण करा, मोदींचे राज्यांना आदेश

गुडगावमध्ये हिंदूंच्या संघर्षाला अखेर यश

काय आहे ‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड’?

याआधी, परमबीर सिंग यांना अनेक समन्स बजावण्यात आले होते, परंतु ते सरकार-नियुक्त न्यायमूर्ती (निवृत्त) केयू चांदीवाल चौकशी आयोग, राष्ट्रीय तपास संस्था आणि मुंबई पोलिसांसमोर यांच्यासमोर हजर झाले नाहीत.

Exit mobile version