अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थाप्रकरणी अटक केल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी २५ कोटीची मागणी केल्याचा आरोप समीर वानखेडे या अधिकाऱ्यावर आहे. त्यातले ५० लाख रुपये त्यांना मिळालेही होते, अशी माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर शुक्रवारी छापे मारले. मात्र यावर वानखेडे यांनी ‘मी देशभक्त असण्याची शिक्षा भोगतोय,’अशी प्रतिक्रिया दिली आहे.
नॅर्कोटिक्स कंट्रोल बोर्डाची जबाबदारी पाहात असताना आर्यन खान याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या सुटकेप्रकरणी ५० कोटींची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ‘त्यांना माझ्या घरातून २३ हजार रुपये आणि चार मालमत्तांची कागदपत्रे सापडली. या मालमत्ता मी नोकरीत रुजू होण्यापूर्वीच घेतल्या आहेत. मी देशभक्त असल्याची शिक्षा भोगतोय,’ असे समीर म्हणाले.
‘मी, माझी पत्नी आणि मुले घरी असताना सुमारे १२ तासांहून अधिक वेळ माझ्या घरात शोधमोहीम सुरू होती. माझ्या पत्नीचा फोनही जप्त करण्यात आला,’ असे त्यांनी सांगितले. समीर हे अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत. सीबीआयला समीर यांची बहीण यास्मिन वानखेडे आणि वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या घरातून २८ हजार रुपये सापडले. तर, सासऱ्यांच्या घरातून १८०० रुपये सापडले.
हेही वाचा :
आत्मनिर्भर नौदलाची ताकद वाढली; ब्राह्मोसची यशस्वी झेप
कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत; भाजपाची हार, जनता दलानेही गमावला विश्वास
द केरळ स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांवर बंदी घालण्याची प्रथा जुनीच !
नवऱ्याने वऱ्हाडींसाठी चिकनचा धरला आग्रह आणि लग्न मोडले, वधूने मग धडा शिकवला!
अमली पदार्थ तस्करीप्रकरणात अडकवण्याचा कट रचणे आणि त्यानंतर लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने एनसीबी सुप्रिटेण्डण्ट विश्वविजय सिंह, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन आणि दोन खासगी व्यक्ती के. पी. गोसावी आणि सॅनव्हिले डिसुझा यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. शुक्रवारी मुंबई, दिल्ली, रांची, लखनऊ, गुवाहाटी आणि चेन्नई या शहरांसह २९ ठिकाणी छापे टाकण्यात आले.