हैदराबादमधील एका ३६ वर्षीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे.चैतन्य मधगनी असे मृत महिलेचे नाव आहे.मृत महिला तिच्या पती आणि मुलासोबत ऑस्ट्रेलियात राहात होती.शनिवारी (९ मार्च) तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, चैतन्य मधगनी हीची हत्या तिचा पती अशोक राज वरिकुप्पाला याने केल्याची माहिती आहे, या घटनेनंतर त्याने हैदराबादला जाऊन आपल्या मुलाला तिच्या पालकांकडे सोपवले.शनिवारी महिलेचा मृतदेह ऑस्ट्रेलियातील बकले येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला.
हे ही वाचा..
बजरंग पुनिया, रवी दाहिया पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर?
शाहजहान शेखवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
दोन हजार कोटींचे ड्रग्ज; उदयनिधी स्टॅलिनना सात लाखांचा वाटा दिल्याचा आरोपीचा दावा
या घटनेची माहिती मिळताच उप्पलचे (पूर्व हैदराबाद) आमदार बंडारी लक्ष्मा रेड्डी यांनी मृत महिलेच्या पालकांची भेट घेतली.कुटुंबांच्या विनंतीवरून आमदार बंडारीलक्ष्मा रेड्डी यांनी मृत चैतन्य मधगनीचा मृतदेह हैदराबादला परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला (MEA) पत्र लिहिले. या महिलेचा मृतदेह हैदराबादला आणण्यासाठी आम्ही परराष्ट्र मंत्रालयाला अर्ज केला आहे. तिच्या आई वडिलांनी ही मागणी केली त्यानंतर मी हे पत्र लिहिलं आहे, असे रेड्डी म्हणाले.
आमदार बंडारी लक्ष्मा रेड्डी पुढे म्हणाले की, महिलेच्या माता-पित्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या जावयाने मुलीची हत्या केल्याचे कबूल केले आहे.तर दुसरीकडे ९ मार्चला ऑस्ट्रेलियातल्या पोलिसांनी असं म्हटलं आहे की, होमिसाइड स्क्वाडचे गुप्तहेर विनचेल्सी यांना एक मृतदेह आढळून आला आहे . त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस त्या ठिकाणी गेले आणि मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यानंतर तिची ओळख पटवली.