30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामानवरा बायकोत वाद पेटला आणि नंतर घरही

नवरा बायकोत वाद पेटला आणि नंतर घरही

Google News Follow

Related

पत्नीशी भांडण झाल्यानंतर स्वतःचे घर जाळताना आजूबाजूची दहा घरेही जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव येथे ही घटना घडली आहे. पत्नीसोबत वाद झाल्याने संतप्त पतीने आपल्या घराला थेट आग लावून टाकली आणि सोबतच आसपासच्या दहा घरांनी पेट घेतला. या घटनेत शेजाऱ्यांचे सुमारे पन्नास लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती मुद्द्यावरून भांडणे सुरु होती. हे भांडण इतक्या विकोपाला गेले की, संजय याने रागाच्या भरात स्वतःच्या घराला आग लावली. आग लावल्यानंतर घरातील सिलेंडरने पेट घेतला आणि स्फोट होऊन नंतर या आगीने रौद्ररुप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना आगीने विळखा घातला. ही सर्व घरे जळून खाक झाली आहेत.

हे ही वाचा:

‘शिवतीर्थावरील इटलीचे दिवे हा योगायोग, की लांगुलचालन?’

कोजागिरी पौर्णिमेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

धर्मांतरविरोधी कायदा करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी

म्हाडासाठी अर्ज करताय? मग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी ते सांगा

या घटनेनंतर संजयला संतप्त ग्रामस्तांनी चांगलाच चोप दिला. आगीत सुमारे पन्नास लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आरोपी पती संजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पती आणि पत्नी यांच्यात वाद नेमका कोणत्या कारणांवरुन झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण या दोघांच्या भांडणात दहा घरांची राखरांगोळी झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा