मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यात श्रद्धा वालकर हत्याकांडासारखे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी रविवारी एका घरातील फ्रिजमधून महिलेचे शव ताब्यात घेतले. सुमित्री मिश्रा हिचा मृतदेह रविवारी त्यांच्या घरातल्या फ्रिजमध्ये सापडला. ती गायब असल्याने तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तेव्हा शोध घेत असताना पोलिसांना तिचा मृतदेह सापडला.
सुमित्रीचा पती भरत मिश्रानेच तिची हत्या करून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला, असा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. तर, मुंबईहून मुलगा येईपर्यंत तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्याचा दावा भरतने केला आहे.
हे ही वाचा:
खासदार अमोल कोल्हेंचा यु टर्न; शरद पवारांसोबत असल्याचे ट्वीट
विरोधकांची बेंगळुरू बैठक पुढे ढकलली! राष्ट्रवादीतील फूट हे कारण?
आधी नितीश, केजरीवाल, नंतर महाराष्ट्र विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडे
पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून ड्रोन उडाला?
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. महिलेचा भाऊ अभय राज तिवारी याने दिलेल्या तक्रारीनुसार, सुमित्रीचा नवरा तिचा छळ करत असे. त्यामुळे त्यानेच दोन दिवसांपूर्वी तिची हत्या करून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला, असा आरोप केला आहे.
मात्र भरत याने त्याच्या पत्नीचा ३० जून रोजीच आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. पतीने याबाबतची माहिती मुंबईत असणाऱ्या त्याचा मुलगा हर्षलाही दिली होती. त्यामुळेच तो येईपर्यंत तिचा मृतदेह सुरक्षित राहण्यासाठी फ्रिज मागवण्यात आल्याचा पतीचा दावा आहे.