पत्नीला वीजेचा धक्का देऊन मारले, घरातच दफन केले…

लखीमपूर उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादचा संशय

पत्नीला वीजेचा धक्का देऊन मारले, घरातच दफन केले…

लखीमपूर येथे उमा शर्मा या महिलेची हत्या वीजेचा धक्का देऊन करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उमा शर्मा ही विवाहानंतर फातिमा या नावाने ओळखली जात होती. तिचा पती अहमद वसीने रागाच्या भरात तिला इलेक्ट्रिक वायरने वीजेचा झटका देत तिची हत्या केली. नंतर त्याच घरात तिचा मृतदेह गाडला.

लव्ह जिहादची ही घटना असल्याचे आता म्हटले जात असून अहमद याच्याशी उमा शर्मा या युवतीचे लग्न झाले. त्यानंतर तिचे नाव फातिमा ठेवले गेले. त्यांना दोन मुले आहेत. पण नवराबायकोमध्ये छोट्याशा कारणावरून भांडण झाल्यानंतर अहमदने फातिमाला वीजेचा शॉक दिला. त्यात तिचा मृत्यू झाल्यानंतर त्याने तिला त्या घरातच दफन केले. अहमदच्या आईनेच ही बाब पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता फातिमाचा मृतदेह घरात सापडला. उत्तर प्रदेशातील हफीजपूर गावात ही घटना घडली.

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेले काम दाखवावे माझ्याकडून बक्षीस मिळेल’

कर्नाटक सरकार चिथावणी देण्याचे काम करते, मुख्यमंत्री शिंदेंनी मांडला ठराव

एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे आपणच वारसदार!

टॉवरवर जीवघेणे स्टंट करणे पडले महागात

अहमदने ही हत्या करून बायकोचा मृतदेह घरात दफन केल्यावर दोन दिवस तो त्याच खोलीत झोपत असे. यावरून त्याच्यातील विकृती समोर आली आहे. आता या घटनेमुळे ही दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. अहमदची आई आपल्या मुलीकडे कानपूरला गेली होती.

घरी परतल्यावर सून घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलाकडे याबाबत विचारणा केली तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा तिने पोलिस ठाणे गाठून आपली सून हरवल्याची माहिती दिली. पोलिसांनी अहमदला ताब्यात घेतले असून त्याने पत्नीला मारून कुठे दफन केले हे पोलिसांना सांगितले. घरातील भिंतीच्या शेजारी तिला दफन करण्यात आले होते. अहमदच्या आईने पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी नवरा बायकोत भांडण झाले होते.

Exit mobile version