ठाण्यातील कासारवडवली गाव दुसऱ्यांदा हादरले!

तिहेरी हत्याकांड, पत्नी मुलांसह तिघांची हत्या

ठाण्यातील कासारवडवली गाव दुसऱ्यांदा हादरले!

ठाण्यातील कासारवडवली गाव दुसऱ्यांदा हादरले आहे,२०१६ मध्ये झालेल्या एकाच कुटुंबियाच्या १४ जणांच्या हत्याकांडानंतर गुरुवारी आणखी एक हत्याकांड कासार वडवली गावात समोर आहे.२९ वर्षीय इसमाने पत्नी ८ वर्षाचा मुलगा आणि ६ वर्षाच्या मुलीची लाकडी बॅटने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे आजच दुपारी ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाण्याच्या पदभार स्वीकारला असून २०१६ मध्ये झालेल्या हत्यांकांडच्या वेळी डुंबरे हे ठाण्याचे सहपोलीस आयुक्त होते. पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून पळून गेलेल्या आरोपी विरोधात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलोसांचे तीन पथके तयार करण्यात आली आहे.

 

भावना अमित बागडी (२४), अंकुश बागडी (८)आणि खुशी (६) असे हत्या करण्यात आलेल्या पत्नी आणि मुलांची नावे असून आरोपी अमित धर्मवीर बागडी (२९) हा आरोपी आहे. अमित बागडी हा मूळचा हरियाणा राज्यात राहणारा आहे.अमित चा सख्खा भाऊ विकास हा ठाण्यातील कासारवडवली गावातील साईंनगर येथे राहण्यास आहे. अमित याला दारूचे भयंकर व्यसन असल्यामुळे व्यसनाला कंटाळून भावना ही दोन्ही मुलांसह पतीला सोडून हरियाणा येथून ठाण्यात लहान दीर विकास सोबत राहत होती.

मागील तीन दिवसांपूर्वी अमित हा मुलांना आणि पत्नीला भेटण्यासाठी ठाण्यात भावाकडे आला होता.अमितचा लहान भाऊ विकास हा गुरुवारी सकाळी ७ वाजता कामावर निघून गेला होता. त्यानंतर सकाळीच साडेअकरा वाजता विकास घरी परतला असता घरातील दृश्य बघून तो हादरला त्याची भावजय भावना आणि तिचे दोन्ही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्यांच्या शेजारीच रक्ताने माखलेली बॅट पडली होती व घरात मोठा भाऊ अमित हा कुठेच दिसत नव्हता.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात वर्गमित्रांनी दहावीच्या विद्यार्थ्याला विवस्त्र करून केली मारहाण!

भावाला किडनी दिली म्हणून दिला तिहेरी तलाक!

संसद भवनाची सुरक्षा आता ‘सीआयएसएफ’ करणार

आता आम्ही कोणतीही मशीद गमावणार नाही…

हे दृश्य बघून विकासने शेजाऱ्यांना गोळा केले. दरम्यान कोणीतरी या हत्याकांडाची माहिती कासारवडवली पोलिसांना दिली. कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय येथे पाठविण्यात आले. या हत्याकांडाप्रकरणी कासारवडवली पोलिसानी फरार झालेल्या अमित बागडी याच्या विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल करून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे तीन पथके तयार करून त्याच्या मागावर पाठविण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे हत्याकांड कौटुंबिक वादातून झाले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या कासारवडवली गावात २०१६ मध्ये एकाच कुटुंबातील १४ जणांची क्रूरपणे हत्या करून हस्नील अन्वर वरेकर याने आत्महत्या केली होती. या हत्याकांडमध्ये कुटुंबातील एकमेव व्यक्ती हस्नील याची बहीण सुबिया जोसेफ भरमल ही वाचली होती. मात्र या धक्क्यातून अद्यापही ती सावरली नसल्याचे बोलले जाते. या हत्याकांडात सुबिया हिने पती आणि मुले गमावली होती. या हत्याकांडच्या वेळी ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे होते तर तत्कालीन सहपोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे होते.

Exit mobile version