…आणि पती तब्बल ७ पोती नाणी घेऊन न्यायालयात पोहोचला!!

या सर्व नाण्यांचे वजन सुमारे २८० किलो होते.

…आणि पती तब्बल ७ पोती नाणी घेऊन न्यायालयात पोहोचला!!

जयपूरमधून एक विलक्षण प्रकरण समोर आले असून सर्वांनाच यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. पत्नीने पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाने आरोपी पतीला तुरुंगात पाठवण्यास सांगितले आणि पत्नीला ५५ हजार रुपये भरपाईची थकबाकी देण्यास सांगितले. पतीने जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या लिंक एडीजे कोर्टात ५५ हजार रुपये रोख जमा केले आहेत. पण ही सर्व रक्कम नाण्यांच्या रूपात जमा केली.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व नाण्यांचे वजन सुमारे २८० किलो होते. सर्व नाणी १, २, ५ आणि १० रुपयांची होती. यामुळे न्यायालयाने सर्व नाणी सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ कुमावतचा १२ वर्षांपूर्वी सीमा कुमावतसोबत विवाह झाला होता. गेल्या पाच वर्षांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. सीमाने पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. सीमा कुमावतला अदा करावयाचा २.२५ लाख रुपये देखभाल भत्ता दशरथने देणे बाकी आहे. ही रक्कम न दिल्याने हरमदा पोलीस ठाण्याने त्याला अटकही केली. दशरथ कुमावत तुरुंगात असल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडे ५५ हजार रुपये नाणी जमा झाले. मात्र, त्यांच्याकडे अद्याप १.७० लाख रुपयांचा भत्ता शिल्लक आहे.

हे ही वाचा:

पालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात महापालिकेवर १ जुलैला मोर्चा

नंदन निलेकणींकडून आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी

ठरलं! या दिवशी श्री राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार

कसे होते पंतप्रधान मोदी यांचे आजवरचे अमेरिका दौरे?

पत्नी सीमा कुमावत यांचे वकील रामप्रकाश कुमावत यांनी हे महिलेला त्रास देण्याचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, पतीच्या वतीने वकील रमन गुप्ता यांनी ५५,००० रुपयांची नाणी वैध भारतीय चलन असल्याचे सांगून रक्कम स्वीकारण्याची विनंती केली. न्यायालयाने ही रक्कम मान्य केली आहे. ही रक्कम मोजण्यासाठी १० दिवस लागतील, असे न्यायालयाने सांगितले. ही सर्व नाणी प्रत्येकी एक हजार रुपयांच्या पिशव्या बनवून मोजून घेण्याचे आदेश न्यायालयाने पतीला दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणीही २६ जूनला निश्चित करण्यात आली आहे.

Exit mobile version