मणिपूरमधून शस्त्रे, स्फोटकांचा मोठा साठा जप्त

काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलाकडून कारवाई

मणिपूरमधून शस्त्रे, स्फोटकांचा मोठा साठा जप्त

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे. काकचिंग आणि थौबल या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान हा शस्त्र साठा सुरक्षा दलांच्या हाती लागला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मणिपूरच्या काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांमध्ये शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला, असे पोलिसांनी सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे. काकचिंग जिल्ह्यातील तुरेनमेई येथील वाबगाई नाटेखाँग येथून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला.

जप्त केलेल्या वस्तूंमध्ये मॅगझिनसह तीन कार्बाइन, एक एअर गन रायफल, दोन सिंगल- बॅरल रायफल, मॅगझिनसह एक ९ मिमी पिस्तूल, १४ डिटोनेटरशिवाय ग्रेनेड, एक मोर्टार, दोन एमके- III ग्रेनेड, ४.७५५ किलो वजनाचा स्फोटक आयईडीचा संशयित कंटेनर समाविष्ट आहे. चार डिटोनेटर्स, सहा अश्रुधुराचे गोळे, दोन अँटी- रॉयट रबर बुलेट, एक स्टिंगर काडतूस, दोन ट्यूब लाँचर, तीन आर्मिंग रिंग, ३४ जिवंत राउंड, २५ स्फोटक काडतुसे, १८७.६२ मिमी फायरिंग केसेस, आणि १० फायरिंग स्फोटक काडतुसे.

थौबल जिल्ह्यातील चिंगखाम चिंग परिसरात सुरक्षा दलांनी मॅगझिनसह एक एसएमजी कार्बाइन, एक एसएसबीएल, मॅगझिनसह एक पिस्तूल, एक इंसास एलएमजी मॅगझिन, एक ८१ मिमी मोर्टार शेल, चार हातबॉम्ब, तीन डिटोनेटर जप्त केले.

हे ही वाचा : 

लँड फॉर जॉब घोटाळा: लालू प्रसाद यादव यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन

आप खासदार संजीव अरोरा यांच्या घरावर ईडीचा छापा!

चेन्नईमध्ये एअर शो बघायला लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू

चिनी नागरिकांना लक्ष्य करून कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आत्मघाती हल्ला

मणिपूरमध्ये बंडखोर कारवाया रोखण्यासाठी पहाडी आणि खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, सुरक्षा दलांनी सर्व असुरक्षित ठिकाणी कठोर सुरक्षा उपाय लागू करून NH-2 वर आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ३४९ वाहनांची तपासणी करत सुरक्षित हालचाल सुनिश्चित केली आहे. शिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, मणिपूरमधील विविध जिल्ह्यांमध्ये १०९ नाके/चौक्यांची स्थापना करण्यात आली आहे.

Exit mobile version