एनसीबीने मंगळवारी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्यात आले असून, गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने पुन्हा एकदा विलेपार्ले परिसरात मोठी कारवाई केली आहे. कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्याची ही कारवाई केल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणातील संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीचे काही अधिकारी बडे ड्रग्ज विक्रेते आणि माफिया यांना सोडून देतात, तर काही ग्रॅम ड्रग्ज जप्त केल्यावर लोकांना गोवले जाते, असा आरोप केला होता. त्यांची केस वाढवून वसुली केली जाते, आजही जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) अफूचे तीन कंटेनर उभे आहेत, असा सवाल त्यांनी केला होता.
हे ही वाचा:
भारत-ब्रिटन लावणार खलिस्तान्यांवर चाप
भाजपासाठी का आहे मध्यप्रदेशच्या जोबटचा विजय महत्वाचा?
तेलंगणामध्येही भाजपाचा बोलबाला
‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात
त्यांच्यावर कारवाई का होत नाही? नवाब मलिक म्हणाले की, आर्यन खानसोबत १८ कोटींची डील केल्याची चर्चा आहे. यापूर्वी सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या प्रकरणाला १४ महिने झाले तरी एनसीबीने आरोपपत्र दाखल केलेले नाही. म्हणजेच एनसीबी संस्था काही काळापासून चर्चेत आहे. अशा परिस्थितीत प्रतिमा सुधारण्यासाठी एनसीबीने केलेली प्रत्येक नवीन कारवाई महत्त्वाची मानली जाते.