23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामा...हा होता सचिन वाझेसह १० आरोपींचा अँटिलिया, हिरेन हत्या प्रकरणातला 'रोल'

…हा होता सचिन वाझेसह १० आरोपींचा अँटिलिया, हिरेन हत्या प्रकरणातला ‘रोल’

Google News Follow

Related

मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ ठेवण्याचे प्रकरण आणि त्याच गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची झालेली हत्या यासंदर्भात १० हजार पानी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आता या आरोपपत्रातील धक्कादायक मजकूर समोर येऊ लागला आहे. या आरोपपत्रात एकूण १० जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

बडतर्फ माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे हा पहिल्या क्रमांकाचा आरोपी असून त्यानंतर नरेश गोर, बडतर्फ पोलिस हवालदार विनायक शिंदे, बडतर्फ पोलिस निरीक्षक रियाझ काझी, बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील माने, संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोटकरी, मनीष सोनी, निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा या १० आरोपांची नावे या आरोपपत्रात आहेत.

या आरोपींना आरोपपत्रात ए-१ ते ए-१० अशी नावे देण्यात आली आहेत. त्यातील सचिन वाझे हा प्रमुख आरोपी आहे. या सगळ्यांचा या संपूर्ण प्रकरणात नेमका काय सहभाग होता, त्याविषयी-

सचिन वाझे (ए-१) :  सचिन वाझे हा या प्रकरणात नंबर एकचा आरोपी आहे. माजी पोलिस निरीक्षक असलेल्या आणि सध्या बडतर्फ असलेल्या वाझेने मनसुख हिरेन यांची गाडी जिलेटिनच्या कांड्या तसेच धमकीचे पत्र यांच्यासह अँटिलियाबाहेर ठेवली. त्यानेच मनसुख हिरेनला गाडी हरविल्याची तक्रार करण्यास सांगितले. पण तीच गाडी त्याने वापरली. त्यानेच नंतर मनसुख हिरेनच्या हत्येचा कटही रचला. शिवाय, हिरेनचे कोणतेही पुरावे सापडू नयेत म्हणून सगळे सीसीटीव्हीचे पुरावे त्याने नष्ट केले. मिठी नदीत त्याने हे पुरावे टाकून दिले. हिरेन यांचा मोबाईलही त्याने नष्ट केला. एवढेच नव्हे तर हिरेन हाच ही कार ठेवण्याच्या कटातील प्रमुख सूत्रधार होता असे दाखविण्याचा प्रयत्न त्याने केला. प्रदीप शर्मासह त्याने हिरेन यांच्या हत्येचा कट आखला. त्यात संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोटकरी, मनीष सोनी हे चौघे सामील होते. पोलिस आयुक्तालयात हा कट रचला गेला. नरेश गोरकडून खोटी सिम कार्ड बनविण्यात आली. सुनील मानेने मनसुखना एकेठिकाणी बोलावून घेतले नंतर त्याला ठार मारण्यात आले. त्यासाठी प्रदीप शर्मा यांना मोठी रक्कम देण्यात आली. खंडणीतून गोळा केलेली रक्कमच त्याने या सगळ्या कामासाठी वापरली. हिरेन यांना या प्रकरणात गुंतवून त्यांचे एन्काऊंटर केल्याचे दाखवत पुन्हा एकदा पोलिस दलात प्रतिष्ठा मिळविण्याचा वाझेचा प्रयत्न होता. सचिन वाझेवर ३०२, १२०बी, २०१, २८६, ३६४, ३८६, ४०३, ४१९, ४६५, ४७३ आणि ५०६ या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नरेश गोर (ए-२) : याने तब्बल १४ बेनामी सिम कार्ड मिळविली आणि विनायक शिंदेच्या माध्यमातून सचिन वाझेला दिली. त्यांचा उपयोग हिरेनच्या खुनासाठी करण्यात आला.

विनायक शिंदे (ए-३) : वाझेने आखलेल्या कटातील आणखी एक सहभागी. सध्या हा पॅरोलवर बाहेर आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरन्टच्या मालकांची वाझेशी भेट घालून देण्याचे काम तो करत असे. जेणेकरून या मालकांकडून नियमित हप्ता वाझेला मिळत राहील. त्यानेच बेनामी सिम कार्ड या हत्येसाठी पुरविण्यात मदत केली.

रियाझ काझी (ए-४) : सचिन वाझेचा सहकारी. या प्रकरणात वापरल्या गेलेल्या गाड्यांच्या खोट्या नंबर प्लेट्स बनविण्याचे काम याने केले. अँटिलिया प्रकरणाती स्कॉर्पिओ गाडीच्या हालचाली टिपणारे सीसीटीव्ही याने नष्ट केले.

सुनील माने (ए-५) : वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या कटाची अंमलबजावणी करण्यात सुनील मानेचा हात होता. या कटासाठी पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकांना हा हजर होता. अँटिलिया प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्याच्या बहाण्याने त्याने मनसुख हिरेन यांना अन्यत्र नेले. त्यासाठी घोडबंदर रोड येथे हिरेन यांना भेटण्यास बोलावले. त्यानंतर हिरेनला हत्या करणाऱ्यांकडे सोपविण्यात आले. त्याच गाडीत हिरेनची हत्या करण्यात आली. नंतर त्यांचा मृतदेह खाडीत फेकून देण्यात आला. हिरेन यांचा फोन वाझेच्या हवाली केला गेला.

संतोष शेलार (ए-६) : शेलारने आनंद जाधव, सतीश मोटकरी, मनीष सोनी या तिघांना घेऊन तवेरा गाडीतून हिरेन यांना नेले. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर शेलारने याच तिघांच्या मदतीने खाडीत हिरेन यांचा मृतदेह फेकून दिला. यासाठी आवश्यक ती सिम कार्डस त्याने मिळविले तसेच फोनही घेतला. हिरेन यांच्या हत्येनंतर ती सिम कार्ड्स आणि फोन नष्ट करण्यात आले. त्यानंतर या चौघांनाही प्रदीप शर्मा यांच्याकडून भरपूर पैसे मिळाले. नंतर शेलार हा मुंबईहून दिल्लीला आणि पुढे नेपाळला पळाला. सोबत मनीष सोनी, मोटकरी हे होते. मोटकरीसाठी त्याने मुंबई ते दुबई विमानतिकिटाचीही व्यवस्था केली.

आनंद जाधव (ए-७) : संतोष शेलार आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून तो या कटात सहभागी झाला. त्याने लाल रंगाची तवेरा गाडी उपलब्ध करून दिली. या गाडीच्या मालकाकडून ही गाडी घेताना लग्नाला जायचे असल्यामुळे गाडी हवी असल्याचे कारण सांगितले. त्यासाठी त्याला १००० रुपयेही देण्यात आले. सुनील माने ही गाडी चालवत होता.

हे ही वाचा:

भाजपाने जाहीर केले पाच राज्यांचे निवडणूक प्रभारी! फडणवीसांकडे सोपवली गोव्याची धुरा

‘सेलमोन भोई’वर कोर्टाने आणली बंदी

संतापजनक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे होते एकूण १३ जण

मोदी सरकारचा चीनला ‘अँटी-डम्पिंग’ दणका

सतीश मोटकरी (ए-८) : सतीश मोटकरी हा संतोष शेलारसह तवेरा गाडीत होता. या गाडीच्या अगदी मागच्या सीटवर हा बसलेला हा. मधल्या सीटवर मनसुख हिरेन होते. तिथून त्याने हिरेन यांच्या तोंडावर अनेक हातरुमाल बांधले आणि त्यांना श्वास कोंडून ठार मारण्यात आले. त्यानंतर हिरेन यांचा मृतदेह खाडीत फेकून देण्यात याचा हात होता.

मनीष सोनी (ए-९) : संतोष शेलारच्या सांगण्यावरून त्याने आपल्या नावावर दोन सिम कार्ड घेतली. त्यासाठी त्याने स्वतःचे आधार कार्ड दिले. त्यानंतर आनंद जाधवसह तवेरा गाडी आणताना तो सोबत होता. गोकुळधाम, गोरेगाव येथील पेट्रोल पंपावर या गाडीत इंधन भरण्यात आले. मनसुख यांची हत्या केल्यावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ज्याच्याकडून तवेरा आणली त्याला ती परत करण्यात आली. नंतर तो संतोष शेलारसह मुंबईहून दिल्लीला गेला मग ते नेपाळला गेले.

प्रदीप शर्मा (ए-१०) :  प्रदीप शर्माने संतोष शेलारला बेनामी सिम कार्ड आणि मोबाईल फोन मिळविण्यास सांगितले. त्यातील एक कार्ड व तो फोन शर्माने वापरला. त्यानंतर हिरेन यांच्या हत्येनंतर सचिन वाझेकडून त्याला भरपूर रक्कम मिळाली. त्यानंतर संतोष शेलारच्या मदतीने त्याने मनीष सोनीला मुंबईहून दुबईला पळून जाण्यास मदत केली. त्यानंतर अंधेरीतील साई लीला हॉटेलात मनीष सोनीची राहण्याची व्यवस्थाही त्याने केली. प्रदीप शर्मावरही ३०२, १२० बी, २०१, ३६४, ४०३ अशा कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

या आरोपपत्रात सुरुवातीला ज्या १० आरोपींवर हे आरोप आहेत त्यांची नावे, फोटो, त्यांचे वय अशी सगळी माहिती देण्यात आली असून नंतर प्रत्यक्ष घटना कशा घडल्या त्याचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा