उरण हत्याकांडमधील मुख्य आरोपी दाऊदचा शोध पोलिसांनी कसा घेतला?

अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितला घटनाक्रम

उरण हत्याकांडमधील मुख्य आरोपी दाऊदचा शोध पोलिसांनी कसा घेतला?

उरणमधील तरुणी यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून कर्नाटकातून आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकरणाबद्दल माहिती दिली आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले की, यशश्री शिंदे हिची हत्या झाल्यानंतर आरोपीला शोधण्यासाठी त्याचा मित्रपरिवार, स्थानिकांची मदत घेण्यात आली. तपासासाठी पोलिसांची पथके नवी मुंबई आणि कर्नाटकमध्ये होती. त्याआधारे मंगळवारी सकाळी मुख्य आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

यशश्री ही २५ जुलै रोजी गायब झाली होती. तिच्या कॉल रेकॉर्डमधून पोलिसांना एक नंबर हाती लागला होता. जिच्यावर तिने दीर्घकाळ संवाद साधला होता. या नंबरची चौकशी केल्यावर तो नंबर दाऊद शेखचा असल्याचे निष्पन्न झाले. दाऊद शेखचा फोन यशश्री गायब झाल्यापासून बंद होता. यामुळे पोलिसांनी दाऊद शेखचा शोध सुरु केला होता. मात्र, यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर दाऊद शेख याचे नेमके लोकेशन सापडत नव्हते. तो कर्नाटकमध्ये राहतो, एवढीच माहिती होती.

हे ही वाचा:

नवाब मालिकांना उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन मंजूर

उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या कर्नाटकातून आवळल्या मुसक्या

हावडा-मुंबई एक्स्प्रेसला झारखंडमध्ये अपघात; १८ डबे रुळावरून घसरले

राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर निर्मला सीतारामन यांनी कपाळावर हात मारला!

दाऊद शेखच्या नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीनंतर आणि दाऊदच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कर्नाटकमधील अल्लर गावातून दाऊद याला ताब्यात घेतले, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील मोसीन हा संशयितही यशश्रीच्या संपर्कात होता. त्याचीदेखील चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

यशश्री शिंदे हिची हत्या केल्याची कबुली दाऊद शेख याने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कर्नाटकमधून दाऊद शेखला ताब्यात घेतले तेव्हा त्याची चौकशी केली. त्यावेळी दाऊदने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली असून यशश्री आणि दाऊद शेख यांची पूर्वीपासून ओळख होती. मध्यंतरी तीन-चार वर्षे ते संपर्कात नव्हते. मात्र, चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसून याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version