उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला असून हिंदू बाजूने सर्वेक्षणासाठी न्यायालयात दाद मागितली होती, न्यायालयाने हिंदू बाजूने केलेल्या मागणीला हिरवा कंदील देत सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर या भागात मोठा हिंसाचार उसळला. यानंतर आता हा हिंसाचार अचानक कसा वाढला आणि त्याचवेळी अनेक लोक शस्त्रे घेऊन कसे जमा झाले होते याची माहिती आता समोर आली आहे. ‘इंडिया टुडे’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
तपास पथकाने संशयितांकडून जप्त केलेल्या मोबाईलमधून काही ऑडिओ क्लिप्स हाती लागल्या असून यात एक अज्ञात व्यक्ती जामा मशीद परिसरात जास्तीत जास्त लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करताना ऐकू येत आहे. शस्त्रे घेऊन मशिदीजवळ या. माझ्या भावाचे घर जवळ आहे, असे ती व्यक्ती म्हणताना ऐकू येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांना अटक केली असून सात एफआयआर नोंदवले आहेत. समाजवादी पक्षाचे खासदार झिया-उर-रहमान बर्क आणि स्थानिक आमदार इक्बाल मेहमूद यांचा मुलगा सोहेल इक्बाल यांची नावेही एफआयआरमध्ये नोंद आहेत. एफआयआरमध्ये पोलिसांनी आरोप केला आहे की, बर्क यांनी हिंसाचाराच्या काही दिवसांपूर्वी शाही जामा मशिदीला भेट दिली आणि प्रक्षोभक टिप्पणी केली ज्यामुळे ही घटना घडली.
हे ही वाचा..
घाटकोपरमध्ये लव्ह जिहाद प्रकरण, आरोपी नौशादवर गुन्हा दाखल!
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी!
मणिपूरमधील संवेदनशील भागात व्यापक शोध मोहीम; ९४ चौक्या स्थापन
झारखंडमध्ये लिव्ह-इन पार्टनरची हत्या
जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर संभलच्या शाही जामा मशिदीच्या आत सर्वेक्षणाचे काम सुरू होते. पाहणी सुरू असताना अचानक मोठ्या संख्येने लोक मशिदीबाहेर जमले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर त्यांनी पोलिस पथकावर दगडफेक सुरू केली आणि वाहने पेटवून दिली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा आणि लाठीमार केला. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला.