महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या डोक्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट आपल्याला कसे दिले जात होते, याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यातून अनिल देशमुख हे अडकत गेले. आता अनेक अशा गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत, त्यामुळे देशमुखांच्या पुढील अडचणी आणखी वाढणार आहेत. त्यातच त्यांच्या अटक करण्यात आलेल्या स्विय सहाय्यकांकडून मिळालेली माहिती, बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेने ईडीकडे दिलेली कबुली, कोलकात्यातील देशमुख यांच्या मुलांच्या कंपन्यांचा मुद्दा या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख आणखी गोत्यात येणार आहेत.
देशमुख यांना अडचणीत आणणारे जे मुद्दे आहेत ते पुढीलप्रमाणे-
- अनिल देशमुखांना या गोष्टी अडचणीच्या ठरणार?
- अनिल देशमुख आणि त्यांच्या नातेवाईकांशी थेट जोडल्या गेलेल्या 14 कंपन्या
- १३ कंपन्यांशी अनिल देशमुख आणि नातेवाईकांचा थेट संबंध
- देशमुख यांच्या मुलांच्या कंपन्यांनी कोलकात्यात खरेदी केलेली झोडियाक डेलकॉम ही कंपनी.
- सर्वच्या सर्व कंपन्यांमध्ये गैरव्यवहारातील पैशांचा व्यवहार झाल्याचा सीबीआय ईडीचा दावा.
- अनिल देशमुख यांच्या बॅंक खात्यामध्ये आलेले पैसे पुन्हा इतर कंपन्यांकडे वर्ग
- तब्बल १० बारमालकांचे नोंदविण्यात आलेले जबाब
- तळोजा कारागृहात सचिन वाझेने नोंदविलेला जबाब
- सरळ अनिल देशमुखांशी संबंध असल्याची सचिन वाझेची कबुली
- हवालामार्फत श्री साई सेवा संस्थेत गैरव्यवहारातला पैसा जमा
- श्री साई सेवा संस्था ट्र्स्ट पदाधिकारी असणारा कुंदन शिंदे
- देशमुखांचे खाजगी सचिव संजीव पलांडे यांचा जबाब आणि ईडीने शोधलेला ‘मनी ट्रेल’
- जैन बंधूंचा ईडीकडून नोंदविण्यात आलेला जबाब