जेवण दिले नाही म्हणून हॉटेल मालकाला घातली गोळी

जेवण दिले नाही म्हणून हॉटेल मालकाला घातली गोळी

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नॉईडामधून एका हॉटेल मालकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री उशिरा जेवण देण्यास हॉटेल मालकाने नकार दिला म्हणू दोन युवकांनी हॉटेल मालकाला गोळ्या घातल्या. आरोपी आकाश आणि योगेंद्र यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि योगेंद्र हे ग्रेटर नॉईडामधील २७ वर्षीय कपिल याच्या हॉटेलमध्ये रात्री पोहचले. मात्र, कपिल याने त्यांना नाईट कर्फ्यूमुळे हॉटेल लवकर बंद झाल्याचे सांगून आता जेवण मिळणार नाही असे सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. मात्र, कपिल याने जेवण देण्यास नकार देताच आकाश आणि योगेंद्र यांनी कपिल याच्याशी वाद घातला. त्यानंतर काही वेळाने दोघेही तिथून निघून गेले. मात्र, रात्री ३.३०च्या सुमारास हे दोघेही पुन्हा बंदूक घेऊन हॉटेलजवळ पोहचले. रागाच्या भरात त्यांनी कपिलवर गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

हे ही वाचा:

फुटबॉलपटू मेस्सीला कोरोनाने गाठले

देशभरातील मुलांच्या ‘दंड’बैठका आजपासून सुरू

अंतिम दिवशी ई-फायलिंग पोर्टलवर करोडो रुपयांचा परतावा

१२ कोटींच्या बुलेटप्रूफ गाडीत बसायला जनतेचे आशीर्वाद लागतात…

नागरिकांनी परी चौकात रात्री गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कपिल याला उपचारासाठी दाखल करत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आकाश आणि योगेंद्र या दोघांनाही अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. हे दोघेही कपिल याच्या हॉटेलचे गेल्या तीन वर्षांपासून नेहमीचे ग्राहक होते अशी माहिती समोर आली आहे.

Exit mobile version