ज्या इमारतीतून दगडफेक झाली त्या नूँहमधील हॉटेलवर बुलडोझर

अनधिकृत हॉटेल असल्याचा प्रशासनाचा दावा

ज्या इमारतीतून दगडफेक झाली त्या नूँहमधील हॉटेलवर बुलडोझर

हरयाणातल्या नूँह येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दंगलखोरांच्या घरावर बुलडोझर फिरविण्याची कारवाई सुरू आहे. त्यात ज्या अवैध हॉटेलमधून दगडफेक केली जात होती, त्या हॉटेललाही बुलडोझरच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे की, हे हॉटेल अनधिकृत मार्गाने उभारण्यात आले होते.    

जिल्हा शहरनियोजन विभागाचे विनेश कुमार यांनी सांगितले की, ही इमारत अनधिकृत होती आणि त्यांना सरकारच्या वतीने नोटीसही पाठविण्यात आली होती. त्याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आली आहे. हे हॉटेल आणि रेस्टॉरन्ट असे दोन्ही स्वरूपात असून त्यातूनच दंगलीच्या काळात दगडफेक झाल्याचा आरोप आहे.

  हे ही वाचा:

रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच तास चौकशी

लोकलमध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा फेक कॉल

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामधून वर्षभरात १०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप

‘राहुल गांधी अजूनही दोषी’

जिल्हा प्रशासनाने शनिवारी २.६ एकर जमिनीवरील १२ वेगवेगळ्या ठिकाणी अवैध घरांवर बुलडोझर फिरविण्यात आला. नूँहमध्ये प्रशासनाने दंगलीत सहभागी असल्याच्या कारणावरून अनेक अवैध बांधकामांवर हातोडा मारला. या अभियानाचा तिसरा दिवस होता आणि त्यात आणखी अनेक अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली. जे या दंगलीत सहभागी होते त्यांचीही अवैध बांधकामे तोडण्यात आली, असे प्रशासनाने स्पष्ट केले.    

हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, या दंगलीच्या मागे मोठे कारस्थान होते. पण सध्याच्या स्थितीत जर सुधारणा झाली तर इंटरनेट सुरू करण्यात येईल. या सगळ्या घटनांची चौकशी केल्यानंतर त्यासंदर्भाती निष्कर्ष काढण्यात येईल. विज म्हणाले की, सध्या यासंदर्भात १०४ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत २१६ लोकांना ताब्यात करण्यात आली आहे. त्यातील ८० लोकांना अटक करण्यात आली आहे.    

Exit mobile version