जेवणाचे बिल मागितले म्हणून पोलिसाकडून ‘फुकट’ची मारहाण!

जेवणाचे बिल मागितले म्हणून पोलिसाकडून ‘फुकट’ची मारहाण!

पुण्याच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे फुकटच्या बिर्याणीचे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच गाजलेले असताना मुंबईत सुद्धा पोलीस अधिकाऱ्याचा फुकटच्या जेवणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सचिन वाझेमुळे अगोदरच प्रतिमा मलिन झालेल्या मुंबई पोलीस दलाला आणखी एका व्हिडीओचा सामना करावा लागत आहे.

हा व्हिडीओ आहे सांताक्रूझ पूर्वेतील वाकोला परिसरातील हॉटेल स्वागतच्या बील काउंटरचा. एक साध्या वेशातील पोलीस अधिकारी हॉटेलच्या गल्ल्यावर असलेल्या व्यक्तीला मारहाण करीत आहे. मारहाणीचे कारण काय तर जेवणाचे बील मागितले म्हणून मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी या व्हिडीओची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहे.

या हॉटेलमध्ये हॉटेल च्या गल्ल्यावर असलेल्या व्यक्तीला मारहाण करणारा व्यक्ती म्हणजे वाकोला पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे विक्रम पाटील नावाचे अधिकारी आहे.

झाले असे की, मंगळवारी रात्री १२ वाजता वाकोला पोलीस ठाण्यातील अधिकारी पाटील हे जेवायला हॉटेल स्वागत मध्ये गेले होते, जेवणानंतर साध्या वेषात असणाऱ्या पाटील साहेब बसलेल्या टेबलावर वेटरने जेवणाचे बील दिले. बील बघितल्यावर पाटील साहेब संतापले आणि जेवणाच्या बिलावरून काउंटरवर असलेल्या व्यक्तीसोबत त्यांची शाब्दिक वाद सुरू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील साहेबानी माझ्याकडे बील मागतात का ? असा सवाल करीत काउंटर वर असलेल्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली, आणि हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. हे प्रकरण वाकोला पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यत पोहोचले आणि प्रकरणाची अधिक वाच्यता नको म्हणून पाटील यांना हॉटेल मालकाची माफी मागण्यास सांगितली.

हे ही वाचा:

‘प्रलय’ ची दुसरी चाचणीही यशस्वी

उर्फी जावेद वाचत आहे भगवद्गीता!

यजमान परभणीसह रत्नागिरी, कोल्हापूर, औरंगाबाद बाद फेरीत

धक्कादायक! महाराष्ट्रातील २४ हजार महिला गायब

 

मात्र वर्दीतील व्यक्ती अश्याप्रकारे हॉटेल व्यवसायिकाला मारहाण कशी करू शकतो,ते देखील जेवणाचे बील दिले म्हणून,याची दखल हॉटेल संघटनेने घेऊन वरिष्ठ अधिकारी यांच्यकडे या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकारी यांची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version