नागपूरच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट

नागपूरच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट

नागपूरचे माजी महापौर संदिप जोशी यांनी काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा अनामत रक्कम घेऊन कोरोना रुग्णांची लूट करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तीन लाखांची अनामत रक्कम रुग्णालयाने घेतल्याची पावती दाखवत त्यांनी नागपूरच्या महापालिका आयुक्तांना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे.

संदिप जोशींनी या संदर्भात ट्वीटरवरून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. आपण रुग्णालयांच्या वाढीव बिलांबाबत काम करत असल्याचे सांगताना यासंदर्भातील तक्रारींचा ओघ वाढतो आहे असे ते म्हणातात. ही रुग्णालयांसाठी लाजिरवाणी गोष्ट असल्याचेही ते म्हणतात. २० टक्के म्हणजेच खासगी रुग्णालयातच रुग्णांना दाखल करून घेतले जात असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

आरसीबीच्या सिंहावर मास्क

आयपीएलवरही आता कोरोनाचे संकट

११ कोटी लसींकरता केंद्राने मोजले १७३२ कोटी

महाराष्ट्रात सर्वत्र हॉलमार्कची सुविधा द्या!

या व्हिडिओमध्ये बोलताना ते म्हणतात की, आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयांना अनामत रक्कम न घेण्याच्या सूचना केल्या आहेत.मात्र तरीही ती वसूल केली जात आहे. थोडी रक्कम घेतलीही जाऊ शकते, परंतु ३ ते ५ लाखापर्यंत अनामत रक्कम वसूल केली जात आहे, आणि तरीही रुग्णालये एक रुपयाचीही अनामत रक्कम घेत नसल्याचे सांगत आहे, असे जोशी यांनी व्हिडिओतून सांगितले आहे. या प्रकरणात ऑडिटर्ससुद्धा निर्लज्जपणे सहभागी होत असल्याचे धक्कादायक विधानही त्यांनी केले आहे.

त्याबरोबरच अनेक रुग्णालये अत्यंत चांगले काम करत आहेत हे देखील मान्य करून, त्यांनी स्वतःकडची एक पावती दाखवली आणि नागपूर महानगरपालिका आयुक्तांना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Exit mobile version