घाटकोपरमधील होर्डिग प्रकरण: भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात

पोलिसांकडून तपास सुरू

घाटकोपरमधील होर्डिग प्रकरण: भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात

मुंबईत अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिग पेट्रोल पंपावर पडून मोठी दुर्घटना घडली. तपासादरम्यान, हे होर्डिंग अनधिकृत आणि नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणात होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यावर गुन्हा दखल करण्यात आला. मात्र, ही दुर्घटना घडल्यानंतर आरोपी भावेश भिंडे बेपत्ता असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी नवा अपडेट समोर आला आहे.

पोलिसांकडून भावेश याचा शोध घेतला जात असताना त्याच्या शेवटच्या लोकेशनबाबत माहिती समोर आली आहे. त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या मुलुंड येथील घरी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तो कुटुंबांसमवेत गायब असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याचे शेवटचे लोकेशन शोधले असता त्यावेळी त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक भावेश भिंडेचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले आहे. मात्र, त्याला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळून आले असून त्यानंतर त्याचा फोन बंद आहे. त्याला पकडण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल.

हे ही वाचा:

उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ योगी आएंगे आएंगे योगी आएंगे

बँक कर्मचारीचं निघाले चोर, लंपास केले ४२ लाख रुपये!

महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पुण्याच्या नारायणगावातून पोलिसांनी ७० जणांना घेतलं ताब्यात

‘मोदींसारखा नेता पाकिस्तानलाही मिळावा’

मुंबईत १३ मे रोजी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी घाटकोपरमध्ये लावलेले एक होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हे होर्डिंग इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लावले होते. भावेश भिंडे हा या कंपनीचा संचालक आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version