25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरक्राईमनामातिने त्याला हनीट्रॅप मध्ये अडकवले; त्याने तिला संपवले 

तिने त्याला हनीट्रॅप मध्ये अडकवले; त्याने तिला संपवले 

Google News Follow

Related

फेसबुकवर हनीट्रॅपमध्ये अडकवून बलात्काराच्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत सतत पैशांची मागणी करणाऱ्या तरुणीची गळा आवळून हत्या केल्याची घटना मुंबईतील वांद्रे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी २४ तासांच्या आत पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

वांद्रे रिक्लेमेशन या ठिकाणी वांद्रे पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह मिळून आला होता. या तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या तरुणीची ओळख पटवण्यासाठी तपास सुरु केला असता या तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत बिपीन कंडलूना या तरुणाला अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

विनानिविदा डायरी छपाईमुळे वाया गेली ‘ऊर्जा’

तुम्हीच आमचे माय बाप…अजूनही जनतेला फडणवीसांकडूनच अपेक्षा

डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपाला नाही

मनसुख हिरेनप्रकरण भोवले; चौथा पोलीस अधिकारीही सेवेतून बडतर्फ

या आरोपीच्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. बिपिनची या तरुणीची ओळख फेसबुक वर ओळख झाली होती. या तरुणीने बिपिनला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मात्र तिने बिपिनला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळत होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिने बिपिनकडे दीड लाख रुपयाची मागणी केली, मात्र माझ्याकडे एवढी रक्कम नसल्याचे सांगून देखील ती ऐकत नव्हती. तू पैसे दिले नाही तर तुझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देईल असे ती बिपिनला धमकावत होती. अखेर बिपिनने कायमचाच पिच्छा सोडवण्यासाठी तिला वांद्रे येथे भेटण्यासाठी बोलावून तिची गळा आवळून हत्या करून तेथून पोबारा केला, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या बिपिनने पोलिसांना दिली.

गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने बिपिनला ला सीसीटीव्हीच्या मदतीने १२ तासात ताब्यत घेऊन त्याला वांद्रे पोलिसांकडे सुपूर्द दिले. वांद्रे पोलिसांनी बिपिनला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा