समलिंगी संबंध ठेवत असताना ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथे घडली. या घटनेमुळे घाबरलेला पार्टनरने मृत व्यक्तीला वैद्यकीय मदत न करता मोबाईल चोरी करून पळ काढला होता.पोलिसांनी त्याला बोरिवली परिसरातून अटक केली आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या प्रकरणी मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पार्टनर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात एका खोलीत ५० वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला होता, लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी त्याला जी.टी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. प्रथम एल.टी.मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. दरम्यान मृत व्यक्तीचे दोन्ही मोबाईल फोन चोरीला गेल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी मोबाईल फोनचा शोध घेतला असता त्यातील एक मोबाईल फोन बोरिवली येथे एक व्यक्ती वापरत असल्याची माहिती मिळाली.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांचा जखमी पोलिसांशी संवाद; कामाचे कौतुक करत बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा
युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प पुतिन यांच्याशी करणार चर्चा
मार्चच्या अखेरीस ओडिशात होणार राष्ट्रीय खोखो स्पर्धा
‘काँग्रेसच्या सत्तेत मणिपूर जळत राहिला, पण काँग्रेसने लक्ष दिले नाही’
पोलीस पथकाने बोरिवली येथून ३४ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू बाबत धक्कादायक माहिती समोर आली.पोलिसांनी अटक केलेला व्यक्ती आणि मृत व्यक्ती हे समलिंगी असून दोघे समलिंगी संबंध ठेवताना अचानक ५० वर्षीय व्यक्ती अचानक बेशुद्ध पडला, हे बघून त्याचा पार्टनर घाबरला आणि त्याने ५० वर्षीय व्यक्तीला वैद्यकीय मदत न देता त्याच्या जवळ असणारे दोन्ही मोबाईल फोन घेऊन तेथून पळ काढला होता.
याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), ३०५ अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सोमवारी राहत्या परिसरातून पोलिसांनी ३४ वर्षीय आरोपीला अटक केली. याप्रकरणी एलटी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.