हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला कर्नाटकातून अटक

हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला कर्नाटकातून अटक

जम्मू काश्मीर पोलीस आणि बंगळूरू पोलिसांनी कर्नाटकमधून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. ही कारवाई रविवार, ५ जून रोजी करण्यात आली होती. हा दहशतवादी हिजबूल मुजाहिद्दीन या संघटनेचा असून त्याचे नाव तालिब हुसैन आहे. याचा टार्गेट किलिंगमध्ये सहभाग असल्याचा संशय होता त्यामुळे शोधमोहीम राबवण्यात येत होती.

हिजबूल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी तालिब हुसैन याला कर्नाटकच्या बंगळुरू येथून अटक करण्यात आली. तालिब हुसैन असे दहशतवाद्याचे नाव असून तो पत्नी आणि मुलांसह काश्मीर सोडून पळाला होता. तालिब हुसैन याला जम्मू-काश्मीर आणि बंगळुरू शहर पोलिसांनी रविवारी अटक केली होती. त्यानंतर तालिबच्या प्राथमिक चौकशीनंतर मंगळवार, ७ जून रोजी सुरक्षा दलाने त्याच्या अटकेची माहिती दिली.

हे ही वाचा:

७५ किमीचा रस्ता पाच दिवसात बांधून भारताने रचला विक्रम

नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स आखाती देशांवर बरसले; ते टीकेच्याच लायक आहेत…

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन केंद्राचीच!

आता रेल्वेत महिन्याला होणार २४ तिकिटांचे बुकिंग

माहितीनुसार, तालिब हुसैन हा त्याच्या पत्नी आणि मुलांसह जम्मू-काश्मीरमधून पळून गेला होता. सुरक्षा दलांनी त्याला पकडण्यासाठी शोध मोहीम तीव्र केली होती. तो बंगळुरूमध्ये लपून बसला होता. तालिबने श्रीरामपुरा येथील मशिदीत आश्रय घेतला होता आणि तो शुक्रवारच्या नमाजच्या वेळी उपस्थितांना संबोधित करत असे. तालिब हा २०१६ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. सुरक्षा दलाच्या हिटलिस्टमध्ये त्याचे नाव होते.

Exit mobile version