अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरचा खात्मा

अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन (HM) चा कमांडर मारला गेला आहे. गेले काही दिवस टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून शोध मोहीम सुरू आहे.

जम्मू आणि काश्मीर पोलिसांना शनिवार, ४ जून रोजी मोठे यश मिळाले असून अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मारला गेला आहे. निसार खांडे असे या कमांडरचे नाव होते. पोलिसांनी त्याच्याकडून AK 47, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. सध्या पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

हे ही वाचा:

‘घोडेबाजार’ शब्दावरून अपक्ष नाराज

हैदराबाद बलात्कार प्रकरणी टीआरएस नेत्याच्या मुलाला अटक

शिक्षकांच्या प्रशिक्षणात गोंधळ; ऑफलाइन प्रशिक्षण घेण्याची मागणी

शोपियानमध्ये ग्रेनेड हल्ल्यात दोन मजूर जखमी

शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांना अनंतनागच्या ऋषीपोरा भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांसह लष्कर आणि सीआरपीएफने या परिसराला घेरून शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा एक कमांडर मारला गेला. तर सुरक्षा दलांवर केलेल्या गोळीबारात लष्कराचे तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Exit mobile version