लखनौच्या प्राणीसंग्रहालयातील पाणघोड्याचा क्लिनरवर हल्ला, क्लिनरचा जागीच मृत्यू!

पाणघोड्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना

लखनौच्या प्राणीसंग्रहालयातील पाणघोड्याचा क्लिनरवर हल्ला, क्लिनरचा जागीच मृत्यू!

लखनौ प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यावर सोमवारी एका पाणघोड्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पाणघोड्याची साफ सफाई करण्यासाठी कामगार पाण्यात गेला असता पाणघोड्याने त्याच्यावर हल्ला केल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

विशेष म्हणजे लखनौ प्राणीसंग्रहालयातील याच पाणघोड्याने काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्यावर हल्ला करून जखमी केले होते.पाणघोड्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.

प्राणीसंग्रहालय कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पाणघोड्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव सुरज असे आहे.सोमवारी पाणघोड्याची सफाई करण्यासाठी सुरज पाण्यात गेला तेव्हा पाणघोड्याने त्याच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात कर्मचारी सुरजचा मृत्यू झाला, असे प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी कानपूर प्राणीसंग्रहालयातून हे पाणघोडे लखनौ प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले होते.

हे ही वाचा:

गोरंट्याल फसले; तो सलीम कुत्ता नाही तर सलीम कुर्ला!

तीस साल बाद???? मृत्यूची बातमी की अफवा?

 गोंधळ घातल्याप्रकरणी तब्बल ३३ विरोधी खासदारांचे निलंबन

मंत्रिपद आहे तोपर्यंत चालक विरहित गाडी नाही!

ते पुढे म्हणाले की, याआधी लखनौ प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी राजू याच्यावर देखील याच पाणघोड्याने हल्ला केला होता.या हल्ल्यात कर्मचारी राजू जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

पाणघोड्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला सूरज हा लखनौचा रहिवासी असून त्याने प्राणीसंग्रहालयातील १२ वर्ष काम केले होते.त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असल्याचे प्राणीसंग्रहालय कर्मचार्‍यांनी सांगितले.

 

Exit mobile version