हैदराबाद येथे एका मुस्लिम तरुणीने हिंदू तरुणाशी विवाह केल्यानंतर त्या तरुणीच्या भावाने हिंदू तरुणाला भर रस्त्यात ठार मारल्याची घटना घडली आहे.
सररूरनगर येथे ही घटना घडली असून त्याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नागराजू याने सुलताना या तरुणीशी विवाह केला होता. तो आपल्या बायकोसह बाईकने चाललेला असताना भररस्त्यात नागराजूवर भररस्त्यात लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. त्यानंतर नागराजूला चाकूने भोसकण्यात आले. नागराजूच्या पत्नीसमोरच ही हत्या करण्यात आली. आता हिंदू संघटनांनीही या प्रकरणात उडी घेतली असून पोलिस आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘राणा दाम्पत्याचा जेलमधला अनुभव ऐकून इंग्रजांच्या जेलची आठवण’
२०२४ साली इस्रो करणार ‘शुक्र’ मोहीम
रंगारेड्डी जिल्ह्यातील मपरपल्ली या गावात नागराजू हा राहात होता. सुलताना त्याच्या शेजारी असलेल्या घानापूर गावात राहणारी होती. दोघेही सात वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते, त्यांचे संबंधही होते. पण सुलतानाच्या घरातून या लग्नाला विरोध होता. सुलतानाचा भाऊ या लग्नामुळे नाराज होता. त्यातून ही हत्या झाली.
तेलंगणाचे भाजपा आमदार राजा सिंह यांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. नागराजूवर हल्ला करणारे परिवारातील सदस्य होते की, कोणत्या धार्मिक गटाने हा हल्ला करण्याचा सल्ला दिला याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. यावर्षी ३१ जानेवारीला या दोघांनी विवाह केला होता. आर्य समाज मंदिरात हा विवाह पार पडला होता. पण सुलतानाच्या कुटुंबियांना हा विवाह मान्य नव्हता.