27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाहिंदू तरुणाची धारावीत धारदार शस्त्राने हत्या, विश्व हिंदू परिषदेची पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

हिंदू तरुणाची धारावीत धारदार शस्त्राने हत्या, विश्व हिंदू परिषदेची पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

धारावी पोलिसांनी तात्काळ निशार आणि आरिफ याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल

Google News Follow

Related

धारावीमध्ये २७ वर्षीय हिंदू तरुणांच्या हत्येने धारावीत तणाव निर्माण झाला आहे, पोलिसांनी ‘एफआयआर’ (प्रथम खबरी अहवाल)मध्ये सात जणांपैकी दोघांना आरोपी दाखवल्याने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. “आमचा तपास सुरू आहे, तपासात ज्याचे नाव निष्पन्न होतील, त्यांना आरोपी करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचे कळते.

अरविंद वैश्य (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे. अरविंद हा कुटूंबियासह धारावीतील राजीव गांधी नगर येथे राहण्यास होता. मेडिकल दुकानात काम करणारा अरविंद याचा मित्र सिद्धेश आणि त्यात परिसरात राहणारे मुस्लिम तरुण अल्लू, आरिफ आणि शेरअली यांच्यात भांडण सुरू होते. शनिवारी अरविंद हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता अल्लू, आरिफ आणि शेरअली यांनी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अरविंदला मारहाण केली होती. या मारहाणीचा तक्रार देण्यासाठी सिद्धेश आणि अरविंद हे दोघे पोलीस ठाण्यात गेले होते असता निशार शेख, आरिफ आणि इतर सहकाऱ्यांनी अरविंदच्या छातीत धारदार शस्त्राने वार केले, त्यात अरविंदचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

पॅरिस ऑलिम्पिक : डिझायनर तहलीयानी म्हणाले, खेळाडूंची गणवेशनिर्मिती विचारपूर्वकच !

केजरीवालांविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र

खारघरमध्ये गोळीबार करत दागिन्यांच्या दुकानात दरोडा; लाखोंचे दागिने लुटले !

दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर नियमांचे उल्लंघन करणारे १३ कोचिंग सेंटर्स सील

या प्रकरणी धारावी पोलिसांनी तात्काळ निशार आणि आरिफ याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून दोघाना अटक केली.
अरविंद ला ६ते ७ जणांनी मिळून मारले आणि एफआयआर मध्ये २ आरोपीचे नावे देण्यात आल्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी इतर आरोपीचे नाव एफआयआर मध्ये का टाकण्यात आले नाही, पोलीस आरोपीना पाठीशी टाकत असल्याचा आरोप करून विश्व हिंदू परिषदेच्या ५० ते ६० कार्यकर्त्यानी धारावी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करून पोलिसांविरोधात घोषणा बाजी देऊन पोलीस उर्वरित आरोपीना पाठीशी घालत असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

विश्व हिंदू परिषद च्या आंदोलनामुळे धारावीत काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी त्यांना शांत करून तपासात ज्या कुणाचे नाव समोर येतील त्यांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.
पोलिसांच्या आश्वासनानंतर येथील तणाव निवळला असला तरी हिंदू तरुणांच्या हत्येमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा