२०० जणांच्या जमावाने केला बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला

२०० जणांच्या जमावाने केला बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉन राधाकांता मंदिरावर गुरुवारी संध्याकाळी जमावाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि या जमावाने येथे ठेवलेल्या मौल्यवान वस्तूही लुटल्या आहेत. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त समोर येत आहे.

ढाका येथील लाल मोहन साहा स्ट्रीटवर असलेल्या इस्कॉन राधाकांता मंदिरात सायंकाळी सात वाजता हा हल्ला झाला. हाजी सैफुल्ला यांच्या नेतृत्वाखाली दोनशेहून अधिक लोकांच्या जमावाने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मंदिराची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. या हल्ल्यात सुमंत्र चंद्र श्रवण, निहार हलदर, राजीव भद्र यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत.

यावर भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ” ज्या देशाच्या निर्मितीसाठी भारताने रक्त सांडले आहे त्या बांगलादेशात हिंदूंविरुद्ध अशा सुनियोजित पद्धतीने हल्ले करणे वेदनादायक आहे. ”

बांगलादेशात हिंदू मंदिरावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेक वेळा असे हल्ले झाले आहेत. गेल्याच वर्षी नवरात्रीला हिंदूंविरोधात अफवा पसरवून दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले झाले होते. त्याचवेळीही ढाका येथील इस्कॉन मंदिरावरही हल्ला केला होता.

हे ही वाचा:

शिवसेनेचे सभासद कार्ड, पैसे उकळले मनसेच्या नावाने?

चिदंबरम म्हणाले, मी प्रियांका गांधींना आधीच सांगितले होते, पण…

राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

हिजाब वादानंतर फक्त ‘याच’ विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी

बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांवर काम करणाऱ्या AKS या संस्थेनुसार, बांगलादेशातील अल्पसंख्याकांना गेल्या नऊ वर्षांत ३ हजार ६७९ हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान धार्मिक स्थळांची तोडफोड आणि सशस्त्र हल्ल्याची १ हजार ६७८ प्रकरणे समोर आली आहेत. याशिवाय बांग्लादेशात हिंदू समाजाला लक्ष्य करून घरांची तोडफोड, जाळपोळ यासह वारंवार हल्ले होत असतात.

Exit mobile version