बिहारमध्ये हिंदू पुजाऱ्यांची निर्घृण हत्या

बिहारमध्ये हिंदू पुजाऱ्यांची निर्घृण हत्या

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात सबंध राज्याला हादरवणारी घटना घडली. मधुबनी जिल्ह्यातील खिरहार पोलिस ठाण्याच्या परिसरातील धरोहर महादेव मंदिरात दोन पुजाऱ्यांचा शिरच्छेद केलेला आढळला.

हीरा दास (७०) आणि आनंद मिश्रा (५०) अशी मृत्युमुखी पडलेल्या पुजाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे या मंदिरातील नेहमीचे पुजारी नव्हते. ते काही धार्मिक कार्यांसाठी येत असत.

हे ही वाचा:

ऑक्सिजन, रेमडेसीवीरसाठी ठाकरे सरकारने काय केले?

राज ठाकरेंनी पुन्हा लिहिले मोदींना पत्र

ऑक्सिजन, रेमडेसीवीरसाठी ठाकरे सरकारने काय केले?

प्रायव्हसी पॉलिसी प्रकरण, दिल्ली उच्च न्यायालयाने फेसबूक आणि व्हॉट्सऍप्पची याचिका फेटाळली

या मंदिराचे मुख्य पुजारी नारायण दास यांनी हा प्रसंग स्वतः घडताना पाहिला. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार हरलाखी गावातील दिलीप चौधरी नावाच्या एका अधमाने पुजाऱ्यांवर मध्यरात्री, ते गाढ झोपेत असताना हल्ला केला आणि कुदळीने त्यांच्या गळ्यावर घाव घालून अत्यंत अमानुषपणे त्यांची हत्या केली. त्यानंतर त्या इसमाने हे दोन्ही मृतदेह गवताच्या गंजीखाली लपविण्याचा प्रयत्न केला.

दिलीप चौधरी त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर दास यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना रक्ताने माखलेली कुदळ चौधरीच्या घरून सापडली तर या दुर्दैवी पुजाऱ्यांची मस्तके मंदिराच्या परिसरातच सापडली. यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येनंतर हा आरोपी फरार झाला होता.

दास यांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी नेहमी या मंदिरात येत असे.  परंतु सध्याच्या कोविड काळातील निर्बंधांमुळे एकूणच मंदिरात येणाऱ्या भक्तगणांची संख्या रोडावली होती. दास यांनी सारा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर घडताना पाहिला होता, जो त्यांनी पोलिसांसमोर कथन केला. काही लोकांच्या मते चौधरी हा मानसिक रुग्ण होता.

Exit mobile version