आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तानमध्ये एक सामाना झाला होता, या सामन्यात भारत जिंकला होता. त्या विजयानंतर ब्रिटनमध्ये हिंदू मुस्लिम यांच्यात तणावाच्या बातम्याही आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या पूर्वेकडील शहर लीसेस्टरमध्ये हिंसाचार आणि दोन समुदायांमधील तणावानंतर २७ लोकांना अटक करण्यात आली आहे.
२८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप क्रिकेट सामन्यानंतर तणाव सुरू झाला होता. आशिया चषक स्पर्धेतील हा सामना भारताने जिंकला आणि पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर पाकिस्तान समर्थकांनी निषेध मोर्चा काढल्याने तणाव निर्माण झाला. या निषेध मोर्चाच्या समोर आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये पोलीस या आक्रमक निषेध मोर्चाचे नियंत्रण करताना दिसत आहेत. पोलिसांनी थांबवूनही काचेच्या बाटल्या फेकल्या तर काही लोक लाठ्या-काठ्या घेऊन रस्त्यावर उतरल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये लीसेस्टरमधील मेल्टन रोडवरील मंदिराच्या बाहेर एक व्यक्ती ध्वज धरून आहे.
हे ही वाचा:
“काँग्रेस पक्षातील कारस्थानांमुळे मला मुख्यमंत्रीपदावरून हटवले”
पत्रकार विजय सिंह यांना पितृशोक
टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’
सातत्याने हिंसाचार आणि तणावाच्या घटना समोर येत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यानंतर चाहत्यांमध्ये निर्माण झालेल्या तणावाने आता हिंदू-मुस्लिम तणावाचे रूप धारण केले आहे. यानंतरच लेस्टरमध्ये पुन्हा एकदा गोंधळ उडाला. याप्रकरणी पोलीस सक्रिय झाले असून आतापर्यंत २७ जणांना अटक करण्यात आली आहे. लेस्टर पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे शांततेचे आवाहन केले, परंतु तणाव अजूनही कायम आहे. हिंसाचार किंवा गोंधळ सहन केला जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगतले आहे.