बांगलादेशात मंदिरे आणि मूर्त्यांचा विध्वंस; तस्लिमांकडून तीव्र निषेध

बांगलादेशात मंदिरे आणि मूर्त्यांचा विध्वंस; तस्लिमांकडून तीव्र निषेध

पाकिस्तानात मंदिर उद्ध्वस्त करण्याची संतापजनक घटना ताजी असताना आता बांगलादेशातही मंदिरांचा विध्वंस केल्याची चीड आणणारी घटना घडली आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी या घटनेचा निषेध करत ट्विट केले आहे आणि कशापद्धतीने बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूचा छळ सुरू आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

ही घटना घडली आहे खुलना या गावात. या गावात हिंदूंच्या मंदिरांवर हल्ला करून देवीदेवतांच्या १० मूर्त्या फोडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी स्थानिक हिंदूंच्या दुकानांवर हल्ले करून ती लुटली आणि घरांवरही ते चाल करून गेले.

यासंदर्भात १० जणांना अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यात शरिफुल इस्लाम, सम्राट मूल्ला, मंजुरुल आलम, शरिफुल इस्लाम शेख, राणा शेख, मोमिनुल इस्लाम, अक्रम फकिर, शोहेल शेख, शमिम शेख आणि जमिल विश्वास अशी या अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत तस्लिमा नसरीन यांनी ट्विट केले आहे की, ‘मी २९ वर्षांपूर्वी ‘लज्जा’ ही कादंबरी लिहिली. त्यात मुस्लिम कट्टरवाद्यांकडून बांगलादेशात हिंदूंवर कसे अत्याचार होतात आणि या अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात बांगलादेश सरकार अपयशी ठरते, हेच मी विषद केले होते. पण या घृणास्पद घटना अजूनही घडत आहेत. खुलना गावात कालच हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली.’

स्थानिकांनी यासंदर्भात सांगितले की, शेजारच्या शेखपुरा, बमनदंगा, चादपूर या भागातून हे हल्लेखोर आले होते. हिंदू आणि मुस्लिम गटात झालेल्या वादावादीनंतर ही घटना घडली. या हल्लेखोरांनी शियाली महास्मशान मंदिरावर हल्ला केला. त्यात त्यांनी सगळ्या मूर्त्या फोडल्या आणि स्मशानभूमीतील सगळ्या वस्तूंचा विध्वंस केला. त्यानंतर हे हल्लेखोर हरी मंदिर, दुर्गा मंदिर, गोविंदा मंदिरात गेले आणि तिथेही त्यांनी मूर्त्यांवर घाव घातले. शिवपद धर हे तिथे राहतात. त्यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. त्यांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले.

हे ही वाचा:
तरीही एजन्सीने पुरवला गळका सिलिंडर

सावधान ! डासांचे आक्रमण सुरू झाले आहे

तिसरा सिझन आला! आणि काय हवं?

‘न्यूज डंका’च्या पत्रकारांनी दिला आपदग्रस्तांना मदतीचा हात

त्याआधी, हिंदुंचा एक समुदाय महास्मशान मंदिराकडे कीर्तन गात चालला होता. मशिदीत सुरू असलेल्या नमाझात या कीर्तनाचा अडथळा येत आहे, असे सांगत तेथील मशिदीच्या मौलानाने त्यांना मशिदीसमोर गाणे म्हणू नका म्हणून इशारा दिला.

Exit mobile version