घरातून हुसकावल्याबद्दल भाजपाने विचारला सवाल
मोहम्मद अली रोडवरील एका हिंदू तरुणीचा एक व्हीडिओ व्हायरल होत असून त्यात ती तरुणी आपण हिंदू असल्यामुळे आपल्यावर कसे अत्याचार होत आहेत, आपल्याला घरातून कसे हुसकावून लावण्यात आले आहे, तसेच घर कसे सीलबंद करण्यात आले आहे, याची करुण कहाणी ऐकवत आहे.
मोहम्मद अली रोड पर हिन्दुओं की प्रताड़ना हो रही है। आज हिन्दू संगठनों का वहां आंदोलन शुरू है, यदी सोमवार तक पीड़ित बहन को न्याय नहीं मिला तो म्युनिसिपल कमिशनर और पुलिस कमिशनर से मुलाकात करेंगे। इस षड़यंत्र के पीछे चाहे कितने भी बड़े लोग हो, उसे कड़ी सजा मिलने के लिए प्रयास करेंगे pic.twitter.com/3vSmsgYpxs
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) July 30, 2022
ही तरुणी या व्हीडिओमध्ये म्हणते की, मी कृष्णा सारिका. मी हिंदू आहे याची शिक्षा मला मिळाली. माझ्या अवतीभवती मुस्लिम वस्ती आहे. माझ्याशी छेडछाड करतात, घरासमोर बकरी कापली जाते. लाऊडस्पीकर लावले जातात. भजन कीर्तन करण्यास मनाई केली जाते. त्याविरोधात मी एफआयआर केला. एफआयआर मागे घेतला नाही तर घर खाली करावे लागेल, अशी धमकी दिली गेली. आमिन पटेल यांच्या नावाने धमकी दिली. आमच्याविरोधात जाऊन आमिन पटेल त्यांची मते गमावणार नाहीत, असेही मला सुनावण्यात आले. मग त्यांनी पालिकेत जाऊन दबाव आणला आणि मला घरातून बाहेर काढले, माझे घर सीलबंद केले. माझ्या आजोबांच्या या घरातून मला काढण्यात आले. अनेक लोक इथे अनधिकृत पद्धतीने राहतात त्यांना काढले जात नाही. पण मला घराबाहेर काढले गेले. मला कुणीही मदत केलेली नाही. केवळ मी हिंदू असल्यामुळे माझ्याविरोधात हे षडयंत्र रचले जात आहे.
हे ही वाचा:
जागा झाला कोमात गेलेला मराठी बाणा…
तटरक्षक दलाने समुद्राखाली फडकवला तिरंगा
पाहा, उपमुख्य अभियंता काय करतोय? अमित साटम यांचे पत्र
आनंद दिघेंच्या बाबत काय झाले हे योग्य वेळी सांगेन!
यासंदर्भात भाजपा नेते आणि मुंबईचे प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी याविरोधात आवाज उठविला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, मोहम्मद अली रोडवर हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंदू संघटनांचे तिथे आंदोलन सुरू आहे. पण सोमवारपर्यंत जर या पीडित तरुणीला न्याय मिळाला नाही तर पालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांची आम्ही भेट घेऊ आणि या षडयंत्रामागे जे कुणीही असेल त्यांना कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न केले जातील.