एकतर्फी प्रेमातून हिंदू मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. नीतू असे मृत मुलीचे नाव असून तिचे वय फक्त सतरा वर्ष होते. लईक खान या तिच्या मित्राने तिची हत्या केली. १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील रोहिणी परिसरातील बेगम विहार भागात ही घटना घडली. लईक हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लईक खान ह्याला नीतू शर्माशी लग्न करायचे होते. पण नीतू या लग्नासाठी तयार नव्हती. नीतूचा नकार पचवू न शकल्याने लईक खानने तिची निर्घृण हत्या केली आहे. कौशल कुमार या नीतूच्या भावाने यासंबंधी पोलीस तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून या एफआयआर मध्ये कलम ३०२ लावण्यात आले आहे.
हे ही वाचा:
रिंकु शर्माच्या हत्येच्या वेळी दिल्या होत्या ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा
कुमार यांनी दाखल केलेल्या तक्ररीनुसार, नीतू आणि लईक हे एकमेकांना ओळखत होते. नीतू आणि तिचा परिवार वर्षभरापूर्वी दिल्ली येथे स्थलांतरित झाला. त्यापूर्वी ते उत्तर प्रदेश मधील हरडोई येथे राहत होते. तिथे लईक हा त्यांचा शेजारी होता. नीतूला भेटण्यासाठी अनेकदा तो दिल्ली येथे येत असे. गेल्या काही महिन्यांपासून लईक लग्नासाठी नीतूच्या मागे लागला होता पण नीतूने त्याला साफ नकार दिला होता.
१९ फेब्रुवारी रोजी लईक नीतू हिला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत एक हातोडा होता. कौशल कुमार हा देखील नीतूच्याच घरी होता. लईकने आपण जेवायला थांबणार असून जेवणासाठी चिकन खाण्याची इच्छा व्यक्त केली. नीतूची परवानगी घेऊन कौशल चिकन आणण्यासाठी बाहेर गेला होता. तो परत आला तेव्हा त्याने लईकला घराचे मुख्य दार बंद करून पळताना पहिले. त्याच्या हातात हातोडी होती. कौशलने त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. घरात शिरल्यावर त्याला गंभीर जखमी झालेली नीतू दिसली. तिला तातडीने संजय गांधी इस्पीतळात दाखल करण्यात आले. पण तिचा दुर्दैवी अंत झाला.
हे ही वाचा:
लईक सध्या फरारी असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. तसेच या प्रकरणाला कुठलीही धार्मिक बाजू नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.