पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादसह अनेक भागांत वक्फ कायद्याच्या विरोधात जोरदार निदर्शने झाली. शनिवारी मुर्शिदाबादमध्ये हिंसक आंदोलने झाली. या हिंसाचारातील एका पीडिताने IANS शी संवाद साधला आणि आपली दुर्दैवी कहाणी सांगितली.
पीडिताने सांगितले, “माझ्या घराशेजारीच माझे दुकान आहेत. निदर्शनांच्या दरम्यान माझ्या दुकानावर हल्ला झाला. जेव्हा हल्ला सुरू झाला तेव्हा मी पोलिस स्टेशनला फोन केला, पण पोलीस आले नाहीत. अर्ध्या तासाने पुन्हा हल्ला झाला आणि मी पुन्हा कॉल केला. असंच दोन-तीन तासांपर्यंत काहीही कारवाई झाली नाही.”
ते पुढे म्हणाले, “हल्ल्यात माझ्या दुकानाचे शटर फोडण्यात आले. दुकानात किमान ५० लाखाहून अधिक किंमतीचे सामान होते, जे सर्व लंपास झाले. त्यानंतर घराचाही दरवाजा फोडून घरातील सामान चोरीला गेले. सलग चार तास उपद्रव सुरू होता, पण प्रशासनाचा काहीही मागमूस नव्हता.”
हे ही वाचा:
“तो आला… त्याने पाहिलं… आणि शतकं झुकली!”
उबाठात बिघाडी एकनाथ शिंदेंकडे घाडी
…तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय
८५० बैल आणि ३५० बुलफायटर्सचा पराक्रम बघा
पीडिताने असा गंभीर आरोप केला की, “हल्ला करणारे मुस्लिम लोक होते आणि त्यांनी खास हिंदूंच्या दुकानांची तोडफोड केली. आजूबाजूला असलेल्या मुस्लिमांच्या दुकानांना काहीही इजा झाली नाही – फक्त हिंदूंनाच लक्ष्य करण्यात आले.”