कर्जत, अहमदनगर येथे नुपूर शर्मा यांना समर्थन दिल्यावरून प्रतीक पवार या युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली असून त्याविरोधात आता त्या विभागात संताप व्यक्त होत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची भूमिका स्पष्ट केली.
ही घटना कशी घडली याविषयी प्रतीकच्या नातेवाईकांनी पत्रकारांना माहिती दिली असून तो अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने गेलेला असताना त्याला १४-१५ मुस्लिम तरुणांनी गाठले आणि तुझ्यात हिंदू धर्माविषयीचा किडा आहे का, तू नुपूर शर्माला का समर्थन देतो असे विचारत त्याच्यावर तलवार, कोयते, दांडक्यांनी हल्ला केला. त्यात तो बेशुद्ध पडला. तो मरण पावला असे समजून त्याच्यावर थुंकून हे मुस्लिम युवक निघून गेले. पण तो जिंवत होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
यासंदर्भात कर्जत पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने इथे संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित मुस्लिम युवकांवर कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. हिंदू समाजाने शेपूट घातलेले नाही. चौकशी झाली नाही आणि पवार कुटुंबाला पोलिस प्रशासनाने न्याय दिला नाही तर अशा घटनांना आणखी फूस मिळेल, अशी भीतीही हिंदू राष्ट्रसेनेने यावेळी व्यक्त केली.
हे ही वाचा:
भुजबळ, आव्हाड यांना अजूनही बंगले सोडवेनात
तर हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल
वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली
केसरकर म्हणतात, तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते
नितेश राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट केले. जर अशीच हिंदू तरुणांवर हल्ले होणार असतील तर हिंदू समाजही गप्प बसणार नाही. हिंदूंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल, असा इशारा दिला आहे.