23 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाहिंदू कार्यकर्ता अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर धर्मांधांची दगडफेक, धारावीत संताप, लोक रस्त्यावर उतरले

हिंदू कार्यकर्ता अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर धर्मांधांची दगडफेक, धारावीत संताप, लोक रस्त्यावर उतरले

Google News Follow

Related

धारावी येथे मुस्लिम टोळक्याकडून हत्या करण्यात आलेल्या अरविंद वैश्य या हिंदू तरुणाच्या पार्थिवावर मंगळवारी धारावी ९० फूट रोड येथील स्मशानभूमीत तणावपूर्ण वातावरणात अंत्यविधी पार पडला. या अंत्ययात्रेवर याआधी दगडफेक करण्यात आली होती, त्यामुळे वातावरण प्रचंड संतप्त झाले होते. अरविंद हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है अशा घोषणांनी धारावीचा परिसर दणाणून गेला.  दरम्यान अंत्यविधीसाठी गोळा झालेला एक ते दीड हजार जणांच्या जमावाने धारावी बंदची हाक दिली. त्यात संतप्त जमावाकडून दुकानाची आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली.दरम्यान धारावी मध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या संपूर्ण धारावीत तैनात करण्यात आलेल्या आहे. धारावीत तणावपूर्ण शांतता पसरली असून संपूर्ण धारावीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

धारावी येथील राजीव गांधी नगर मध्ये राहणारा अरविंद वैश्य (२७) या हिंदू तरुणाची रविवारी रात्री काही मुस्लिम तरुणांनी भोसकून हत्या केली होती. अरविंद वैश्य हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता मुस्लिम जमावाकडून त्याला झालेल्या मारहाणीची तक्रार करण्यासाठी अरविंद हा पोलीस ठाण्यात गेला होता, त्यावेळी तो पोलिसांसोबत घटनास्थळी आला असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या निशार शेख उर्फ अल्लू आणि आरिफ या दोघांनी त्याच्या छातीत तीक्ष्ण हत्यार भोसकून हत्या केली होती.

धारावी पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक करून त्याच्या विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल केला होता, दरम्यान या गुन्ह्यात केवळ दोनच आरोपी दाखविल्यामुळे विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. मंगळवारी पोलिसांनी अरविंद वैश्य याचा मृतदेह ताब्यात दिला होता, मंगळवारी अरविंद वैश्य यांच्यावर धारावी ९० फूट रोडवरील स्मशानभूमीत अंत्यविधी होणार असल्यामुळे हजारोच्या संख्येने हिंदू जमाव अंत्यविधीमध्ये सहभागी झाला होता. दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात अरविंद वैश्य याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. दुपारी ४ वाजता अरविंद याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर संतप्त झालेला जमाव धारावीत दाखल झाला व त्यांनी धारावी बंदची हाक देत घोषणाबाजी सुरू केली, हा जमाव पोलीस ठाण्यासमोर एकत्र गोळा झाला आणि आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशा घोषणाबाजी सुरू केली.

हे ही वाचा:

मध्यप्रदेशातील मदरशांवर कारवाई सुरू, श्योपूर जिल्ह्यातील ५६ मदरशांची मान्यता रद्द !

ठाकरेंनी ब्रह्मास्त्रच काढले…

विद्या चव्हाणांना चित्रा वाघ भिडल्या

भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक; नेमबाज मनू भाकर, सरबज्योत सिंगने रचला इतिहास

पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाची समजूत काढून त्यांना तेथून जाण्यास सांगण्यात आले, दरम्यान हा जमावाने घोषणाबाजी करीत दुकानाची आणि वाहनांची तोडफोड सुरू केली. या जमावात तरुणाचा आणि अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग होता. घटनास्थळी स्वतः अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त उपस्थित होते, जमाव अधिक संतप्त झाल्याचे बघून पोलीस बंदोबस्तात वाढ करून अधिक पोलीस कुमक धारावीत मागविण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि शीघ्र कृती दलाच्या तुकड्या धारावीत मागविण्यात आलेल्या आहे.पोलिसांकडून जमावाला शांततेचे आव्हान पोलिसांकडून करण्यात येत होते, या जमावाला पांगविण्यात आले असून संपूर्ण धारावीला पोलिसांनी वेढा घातला असून,धारावीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.या संपूर्ण घटनेनंतर धारावीत तणावपूर्ण शांतता असून नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यासंदर्भात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, धारावी येथे अरविंद वैश्य यांच्या अंतयात्रेत आपण सहभागी होतो. गरीब नवाज या भागातून दगडफेक करण्यात आली, ते आपण पहिले आहे. उरणमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण घडले, त्यातल्या आरोपीला आजच अटक करण्यात आली आहे. विशाळगडावरील लँड जिहादचे प्रकरण आपल्याला माहित आहे. मुंबई असेल महाराष्ट्र असेल येथे सुरु असणारी लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहादची प्रकरणे चिंतेची बाब आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा