मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये आर्थिक मदत करण्यासाठी आणि आयफोन खरेदी करण्यासाठी एका ९ वीच्या विद्यार्थ्याने स्वतःच्या घरातील आईचे दागिने विकून पैसे दिल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीच्या नजफगढ भागात घडला आहे. विद्यार्थ्याच्या आईने पोलीस ठाण्यात चोरीचा एफआयआर दाखल केल्यांनतर पोलिसांच्या तपासात हे उघड झाले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्याने घरातून चोरी केलेलं आईचे दागिणे काकरोळा परिसरातील दोन वेगवेगळ्या सोनारांना विकले आणि त्यातून आलेले पैसे त्याच्या मैत्रिणीला आयफोन घेण्यासाठी दिले. या प्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय सोनार कमल वर्मा याला अटक केली आणि त्याच्याकडून सोन्याची अंगठी अन कानातले जप्त केले.
हे ही वाचा:
विनेशच्या बाहेर पडण्यावर नड्डा म्हणाले, ‘संपूर्ण देश तिच्यासोबत आहे, पण हे दुर्दैव…’
जपानला ७.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; त्सुनामीचाही इशारा
बरेलीमध्ये सीरियल किलर? १४ महिन्यांत ९ महिलांची हत्या !
विधानसभा निवडणुकीत जनता उद्धव ठाकरेंना नाकारेल
पोलीस उपायुक्त अंकित सिंग यांनी सांगितले की, ३ ऑगस्ट रोजी एका महिलेने घरात चोरी झाल्याची एफआयआर दाखल केली होती. सोन्याच्या साखळ्या, एक जोड सोन्याचे कानातले झुमके आणि एक सोन्याची अंगठी २ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या दरम्यान चोरी झाल्याचे महिलेने तक्रारीत सांगितले. तक्रारीच्या आधारे चौकशी केली असता तपासात घरातील व्यक्तीवर तपास पथकाला संशय आला. त्यानंतरच घरातील मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा काबुल केला. आरोपी मुलाने सांगितले की, मैत्रिणीच्या वाढदिवशी छाप पाडण्यासाठी हे सर्व कृत्य केले. आईकडे पैसे मागितले परंतु तिने नकार दिल्याने आईच्या दागिन्यांची चोरी केल्याचे मुलाने सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.