हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हिंदी सिरीयलमध्ये काम करणाऱ्या ४ अभिनेत्रींची सुटका!

पवई पोलिसांची कारवाई

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हिंदी सिरीयलमध्ये काम करणाऱ्या ४ अभिनेत्रींची सुटका!

मॉडेलिंग तसेच हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आणि मॉडेल यांचा ऑनलाईन सेक्सरॅकेटचे जाळे मुंबई पोलिसांनी उध्वस्त केले आहे. पोलिसांनी पवई येथील एका हॉटेलमधून ४ अभिनेत्री यांची सुटका करण्यात आली असून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या ६० वर्षाचा दलाल याला अटक करण्यात आली आहे. या रॅकेट मध्ये बॉलिवूड आणि हिंदी मालिकांमधील अनेक अभिनेत्री देखील गुंतल्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या रॅकेट मधील दलाल श्यामसुंदर अरोरा (६०) व्हॉटअप तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवत असून या सेक्स रॅकेट मध्ये मॉडेल,बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आलेल्या तरुणी तसेच हिंदी सिरीयल मधील अभिनेत्री गुंतल्या असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली होती. या रॅकेट मधील दलाल अरोरा हा ग्राहकांच्या मागणीनुसार सिरीयल मधील नट्या, मॉडेल्स ग्राहकांना पूरवत होता,या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने संबंधित श्यामसुंदरला संपर्क साधून त्याच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती.

बोगस ग्राहकाने दलालासोबत आर्थिक व्यवहार झाला होता, प्रत्येकी एका मॉडेल तसेच अभिनेत्री तरुणीमागे तीन लाख रुपये द्यावे लागतील असे या व्यक्तीने सांगितले होते. या व्यवहारानंतर या तरुणीला घेऊन पवईतील हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलमध्ये घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता तिथे दलाल अरोरा हा चार तरुणीसोबत आला होता.

बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, सूर्यकांत पारटकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, पोलीस हवालदार संदीप सुरवाडे, येडगे, महिला पोलीस शिपाई पवार, सोनकांबळे, ताडगे यांनी तिथे छापा टाकला होता असता श्यामसुंदर अरोरा याला ताब्यात घेण्यात आले, आंबोली येथे राहणारा अरोरा हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत होता आणि त्याला गौरव नावाचा एक दलाल मदत करत होता.

हे ही वाचा : 

अरुणाचलमध्ये रस्ता दुरुस्ती दरम्यान वाहन दरीत कोसळले, कोल्हापुरातील जवान हुतात्मा!

इस्रोची उपग्रह प्रक्षेपणातून ४३९ दशलक्ष डॉलर्सची कमाई

पाकसरकारच्या हट्टीपणामुळे आम्ही सर्व २१४ लष्करी बंधकांना ठार मारले!

हमासचे केले समर्थन; कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी अमेरिकेतून घरी परतली

अरोरायांच्या संपर्कात त्यांच्या संपर्कात काही मॉडेल आणि अभिनय क्षेत्राशी संबंधित अभिनेत्री होते. त्यांना तो ग्राहकोसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत होता. एका अभिनेत्रीसाठी तो ग्राहकाकडून तीन लाख रुपये घेत होता. त्यापैकी अर्धी रक्कम स्वतकडे अर्धी रक्कम तरुणींना देत होता. त्याच्या तावडीतून पोलिसांनी चार हिंदी सिरीयल मध्ये काम करणाऱ्या तरुणींची सुटका केली.

चौकशीदरम्यान त्या चौघीही अभिनय क्षेत्राशी संबंधित असून त्यापैकी काहींनी मॉडलिंग क्षेत्रानंतर अभिनय क्षेत्रात काम सुरु केले होते. काही हिंदी मालिकांमध्ये काम केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी श्यामसुंदरविरुद्ध भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ॲड. पुनाळेकर यांना दाभोळकर प्रकरणात कशी झाली अटक आणि सुटका? महामुलाखत (पूर्वार्ध) | Dinesh Kanji |

Exit mobile version