हिंदू नावाचा वापर करून त्याने मॉडेलला फसवले, पण द केरळ स्टोरीने दिली तिला प्रेरणा

लव्ह जिहादचा आणखी प्रकार आला समोर

हिंदू नावाचा वापर करून त्याने मॉडेलला फसवले, पण द केरळ स्टोरीने दिली तिला प्रेरणा

बिहारमधील मॉडेलने एका व्यक्तीवर धर्मांतराचा आरोप लावला आहे. या मॉडेलने रांचीमधील मॉडेलिंग एजन्सीच्या मालकावर तिचा छळ आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत पोलिस तक्रार दाखल केली आहे. तसेच, या व्यक्तीने तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने मला तक्रार दाखल करण्यास प्रेरित केले, असेही तिने म्हटले आहे.

मानवी नावाची ही महिला मूळची बिहारची आहे. मॉडेल होण्याच्या इच्छेने ती रांची येथील यश मॉडेलिंग एजन्सीमध्ये गेली होती. तिथे तिची एजन्सीच्या मालकाशी मैत्री झाली, ज्याने स्वत:ची ओळख यश अशी दिली होती. पण जसजशी दोघांची मैत्री वाढत गेली, तसतसे मानवीला कळले की त्या माणसाचे खरे नाव यश नसून तनवीर अख्तर आहे. त्यानंतर तन्वीरने तिच्यावर धर्म परिवर्तन करून लग्न करण्यासाठी दबाव टाकला, असा मानवीचा आरोप आहे. तिने तन्वीरवर तिची खासगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला.

मानवीने तन्वीरवर होळीच्या उत्सवात तिला मादक पदार्थ खायला घालण्याचा आणि नंतर तिची खासगी छायाचित्रे काढल्याचा आरोप केला. त्यानंतर तन्वीरने ब्लॅकमेल करून त्रास देण्यास सुरुवात केली, असा दावा तिने केला. तिने तन्वीरविरुद्ध मुंबईत गुन्हाही दाखल केला होता, जो आता रांचीला वर्ग करण्यात आला आहे. मानवीने तक्रार दाखल केल्यानंतर तन्वीरने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून मानवीला त्रास दिल्याची कबुली दिली. तथापि, त्याने असा दावा केला की, तिला हानी पोहोचवण्याचा त्याचा कुठलाही हेतू नव्हता. तसेच, त्याने दोघांनी एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भविष्यात असे पुन्हा करणार नाही, असे आश्वासन देऊनही, तन्वीरने २५ मे रोजी तिच्या वाढदिवशी, पुन्हा तिचा छळ करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मानवीने केला आहे. मानवीने ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड करून झारखंड, महाराष्ट्र आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडे मदत आणि संरक्षण मागितले आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकनंतर आता राजस्थान काँग्रेस सरकारकडून ‘फुकट’ची वीज

धर्मांतरित झालेल्या तरुणाने प्रेयसीचे डोके फोडले; लव्ह जिहादचा उलटा प्रकार

रेल्वेत मिळाला २ लाखांचा फोन, त्याने विकला ३५०० रुपयांना…

आमदार भातखळकरांच्या प्रयत्नांमुळे कांदिवली स्थानकातला सरकता जिना होणार सुरू

‘ द केरळ स्टोरी’ने मला तक्रार नोंदवण्यास केले प्रवृत्त 

मानवीने आरोप केला की, तन्वीरने मुंबईत तिला मारण्याचाही प्रयत्न केला होता. ‘द केरळ स्टोरी’ पाहिल्यानंतर तन्वीरविरुद्ध तक्रार नोंदवण्यास प्रवृत्त झाल्याचे तिने सांगितले. ‘त्याच्याशी लग्न करून माझा धर्म बदलण्यासाठी तो माझ्यावर दबाव टाकत होता. हे सर्व २०२०मध्ये, जेव्हा मी त्याच्या मॉडेलिंग एजन्सीमध्ये रुजू झाले तेव्हापासून सुरू झाले. त्याचे नाव यश होते, असे मला सांगण्यात आले. परंतु चार महिन्यांनंतर मला कळले की, त्याचे खरे नाव तनवीर अख्तर आहे. त्याने माझी छायाचित्रे कुटुंबीयांना पाठवली आणि तो माझ्या छायाचित्रांवर प्रतिक्रियाही देत असे. त्याने मुंबईत मला मारण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहून मी त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यास प्रवृत्त झाले, असे मानवीने म्हटले आहे.

तन्वीरने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. उलट मानवीने त्याची नग्न छायाचित्रे त्याच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांमध्ये प्रसारित केली होती, असा आरोप त्याने केला. “माझ्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. तिने माझे नग्न फोटो माझ्या मित्र आणि नातेवाइकांना पाठवले. तिने यासाठी तिच्या मित्र आणि प्रियकराची मदत घेतली. तिला माझा डेटा चोरायचा होता आणि त्याचा वापर करायचा होता,” असे तन्वीर अख्तरने म्हटले आहे.

रांचीमध्ये एफआयआर

रांची पोलिसांनी एफआयआर दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ‘फिर्यादीने २९ मे रोजी वर्सोवा पोलिस ठाण्यात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ही घटना रांचीमध्ये घडली असल्याने, हे प्रकरण रांची पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. ‘आम्ही एफआयआर दाखल केला असून या प्रकरणाचा तपास करत आहोत,” असे रांचीचे एसएसपी किशोर कौशल यांनी सांगितले.

Exit mobile version