मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८० कोटींचे हेरॉईन जप्त

हेरॉईनची किंमत अंदाजे ८० कोटी रुपये

मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८० कोटींचे हेरॉईन जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने १६ किलो हेरॉईन जप्त केले आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. हेरॉईनची किंमत अंदाजे ८० कोटी रुपये आहे. गुप्त माहितीच्या आधारे एका प्रवाशाला थांबवण्यात आले. यानंतर त्याच्या सामानाची झडती घेण्यात आली. तपासादरम्यान त्याच्याकडून प्रतिबंधित पदार्थ आढळून आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव बिनू जॉन असून तो केरळचा रहिवासी आहे. त्याने डीआरआयला सांगितले की एका परदेशी नागरिकाने त्याला हेरॉईन भारतात नेण्यासाठी कमिशन म्हणून एक हजार अमेरिकन डॉलर्स दिले होते. बिनू जानने त्याच्या इतर अनेक साथीदारांची नावे तपास पथकासमोर उघड केली आहेत. जॉनचा यापूर्वीही भारतात अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग होता का, याचाही तपास डीआरआय पथक करत आहे.

, आरोपीने त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये १६ किलोचे हेरॉईन लपवण्यासाठी बनावट पोकळी बनवली होती. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. आरोपी केरळचा रहिवासी आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असल्याचे डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले . हेरॉईन कोठे नेले जात होते आणि ते कोठून आणले होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न डीआरआयचे अधिकारी करत आहेत. या तस्करीत किती लोक सामील आहेत? मात्र, प्राथमिक तपासात त्या व्यक्तीने काहीही सांगण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी, डीआरआयचे अधिकारी जप्त केलेले हेरॉईनचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल

दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ने भारतीय नौदलासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत कोची किनार्‍याजवळील इराणी बोटीतून २०० किलो संशयित हेरॉईन जप्त केले. बोटीवरील सहा क्रू मेंबर्सना एजन्सीने ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version