ड्रग्ज तस्करीच्या विरोधात सीमाशुल्क पथकाला पुन्हा एकदा यश मिळाले आहे. या पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तस्करासह अडीच किलो हेरॉईन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत जवळपास १६.८० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने शनिवारी मुंबई विमानतळावरून एका परदेशी व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीकडून १६. ८० कोटी रुपये किमतीचे २.४ किलो हेरॉईन जप्त केले, अशी माहिती कस्टम अधिकाऱ्याने सोमवारी दिली.या विदेशी नागरिकांची ओळख पटलेली आहे.
युगांडामधील एंटेबे येथून आलेल्या या विदेशी नागरिकाला विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे त्याला पकडण्यात आले त्यानंतर त्याच्याकडून प्रतिबंधित असलेले एक पाकीट जप्त करण्यात आले. जप्तीनंतर, प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी महसूल गुप्तचर संचालनालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आदिस अबाबा ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका स्थलांतरिताकडून ७० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती डीआरआयने दिली. प्रवासाच्या बॅगेत ९.९७ किलो ड्रग्ज सापडले.
हे ही वाचा:
सीरियात मशरूम पिकवणाऱ्या ३१ शेतकऱ्यांची हत्या
ठाकरे गटाची याचिका फेटाळली; पालिकेत २२७ प्रभागच
बीबीसीला अतीक अहमदबद्दल सहानुभूती, ठरवले रॉबिनहूड
सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नाशिकच्या चांदीच्या गणपतीचे दागिने लंपास
अदिस अबाबाहून मुंबईला जाणारा एक प्रवासी अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी भारतात आला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचला. यानंतर संशयिताला थांबवून त्याची तपासणी केली असता त्याच्या सामानातून ९.९७ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. या औषधाची अवैध आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ७० कोटी रुपये आहे.